22 November 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मोदींनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही, तर तो समाज माध्यमांवरून आलेला

Narendra Modi, javed akhtar

नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केला. दरम्यान नरेंद्र मोदींनी शायरीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर शायरीच्या अंदाजात निशाणा साधला. त्यावेळी तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना बोचऱ्या शब्दात लक्ष्य केलं होतं. गुलामनबी आझाद यांच्या टीकेला मोदींनी काल शायरीच्या माध्यमातून उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी व्यक्त होताना गालिबनं अशा (म्हणजे आझाद यांच्यासारख्या) माणसांसाठी म्हटलं होतं, असं म्हणत मोदींनी एक शायरी सभागृहाला ऐकवली. ‘ता उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा,’ असं त्यावेळी मोदी म्हणाले. आझाद यांना सर्व गोष्टींकडे केवळ राजकीय नजरेतून पाहण्याची सवय झाल्याचा टोला मोदींना शायरीतून लगावला. आम्ही लोकांच्या हितासाठी अनेक प्रक्रिया सोप्या केल्या आहेत, असं म्हणत मोदींनी आझाद यांना जुन्या भारतावरुन आझाद यांना काही प्रश्न विचारले. कॅबिनेटनं घेतलेले निर्णय जाहीर पत्रकार परिषदेत फाडणारा, संरक्षण दलांच्या सामग्रीचा वापर सहलीसाठी करणारा जुना भारत तुम्हाला हवा आहे का, असे बोचरे सवाल पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित करत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

मोदींनी शायरीचा उल्लेख केल्यानं सभागृहात हशा पिकला. परंतु यानंतर अनेकांनी पंतप्रधानांची चूक दाखवून दिली. मोदींनी सादर केलेली शायरी मिर्झा गालिब यांनी लिहिलेलीच नसल्याच्या कमेंट अनेकांनी समाज माध्यमांवर केल्या. त्यात प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनीदेखील यावर भाष्य करत मोदींना तोंडघशी पडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही. तर तो समाज माध्यमांवरून आलेला आहे. खरं तर या शेरमधील दोन ओळी योग्य मीटरमध्येही नाहीत,’ असं अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x