21 November 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – पंतप्रधान मोदी

Prime Minister Narendra Modi, India China, Galwan Valley Of Ladkah

नवी दिल्ली, १७ जून : जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखमधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

चीन आणि भारतीय सैन्य दलात झालेल्या संघर्षावर यावेळी पंतप्रधानांनी थोडक्यात भाष्य केलं. ‘भारताने कधीच कोणावर आक्रमण केलं नाही. तसंच भारत जशाचं तसं उत्तर देण्यास सक्षम असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं मोदी म्हणाले. दरम्यान, पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे ३५ जवान मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “भारतीय जवानांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपली क्षमता सिद्ध केली आहे. विक्रम आणि शौर्य आपल्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे. भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असा विश्वास मला देशवासियांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. यासाठी त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण डिवचलं तर वेळ आल्यावर भारत उत्तर देण्यात सक्षम आहे”.

 

News English Summary: Saying that the sacrifices of the soldiers will not go in vain, Prime Minister Narendra Modi today paid tributes to the Indian soldiers who were martyred in the attack in Ladakh. On the backdrop of Corona, Prime Minister Modi is holding discussions with the Chief Ministers of 15 states today. Before starting the discussion, he paid tributes to all the Chief Ministers and martyrs.

News English Title: Prime Minister Narendra Modi On India China Face Off In Galwan Valley Of Ladkah News latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x