22 November 2024 6:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मजूर घरी परतत आहेत, पण आपल्यासमोर मोठं संकट असणार आहे - पंतप्रधान

PM Narendra Modi, Corona crisis

नवी दिल्ली, ११ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पाचव्यांदा देशभरातील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. आतापर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधान मोदी यांनी पुढची रणनीती आणि आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व राज्य मिळून काम करत आहेत. कॅबिनेट सचिव राज्यांच्या सचिवांशी सतत संपर्कात आहेत. भारत या संकटातून वाचवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. राज्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे.

पुढे काय करावे याबाबतही पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केले. अधिक फोकस ठेवा आणि सक्रियता वाढवा, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. संतुलित रणनीती आखून पुढे जायला हवे. पुढे काय आव्हानं आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढायचा यावर काम करा, असे पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. सर्वांनी आर्थिक विषयावर सूचना करा, असंही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी मजुरांची घरी जाण्याची गरज समजू शकतो. लॉकडाउन लागू केल्यानंतर लोकांना जिथे आहेत, तिथेचं थांबावं यावर आपण जोर दिला होता. पण घरी जाणं हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आपल्याला काही निर्णय बदलावे लागले. आता मजूर गावाकडे जात आहे. आपापल्या घरी पोहोचत आहे. पण, आपल्यासमोर मोठं संकट असणार आहे. करोना गावापर्यंत पोहोचणार हे आपल्यासमोरचं आव्हान आहे,” असं मोदी म्हणाले.

या बैठकीसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण हेदेखील उपस्थित आहेत. बैठक सुरू होताच गृह मंत्री अमित शहा यांनी उपस्थितांना पहिल्यांदा संबोधित केलं.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi spoke to Chief Ministers across the country for the fifth time on the backdrop of the corona virus crisis. Taking stock of the situation so far, Prime Minister Modi presented the next strategy and challenge to the Chief Minister.

News English Title: Prime Minister Narendra Modi spoke to Chief Ministers across the country for the fifth time on the backdrop of the corona virus crisis News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x