लॉकडाउन'बाबत पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता संवाद साधणार
नवी दिल्ली, १२ मे: देशात सोमवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांमध्ये ४,२१३ रुग्ण देशात आढळले. लॉकडाउन असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिलासादायक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यातील स्थिती चिंता व्यक्त करण्यासारखी आहे. त्यामुळे १७ मे नंतर लॉकडाउनचं काय होणार? हे काही दिवसातचं स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत. त्यासंदर्भात केंद्रानं राज्यांना धोरण आखण्याची सूचनाही केली आहे.
कोरोना संकटातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशात लागू असलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा आणि त्या चर्चेचा एकंदर सूर पाहता देशातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा पंतप्रधान मोदी आज करू शकतात. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा चौथा टप्पा वेगळा असेल, अशी चर्चा आहे. यामध्ये राज्य सरकारांना अधिकचे अधिकार मिळू शकतात.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्या संबोधनाद्वारे ते कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने घेतल्या उचललेल्या पावलांबाबत जनतेला माहिती देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी ते लॉकडाउनबाबत महत्त्वाची घोषणा करतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM this evening.
— PMO India (@PMOIndia) May 12, 2020
News English Summary: PM Narendra Modi will once again address the nation against the backdrop of the Corona crisis and lockdown. Prime Minister Modi will address the people of the country tonight at 8 p.m. In his address, he is expected to inform the public about the steps taken by the government to curb Corona. It is also expected that he will make important announcements about the lockdown this time.
News English Title: Prime Minister Narendra Modi to address the-nation today at 8 PM over Lockdown News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार