15 January 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

रिकव्हरी रेट वाढतोय, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले प्रयत्न सफल होत आहेत - पंतप्रधान

Prime Minister Narendra Modi, Video Conference,  10 State Chief Ministers, Coronavirus Pandemic

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, भारतात कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असून ती रोजची संख्या 7 लाखांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाची ओळख होण्यास आणि त्यावर आळा घालण्यास मदत होत आहे. आपल्या देशात मृत्यूचं प्रमाण आधीपासून कमी होतं आणि ते सातत्याने कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. रिकव्हरी रेटही सतत वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यास आपले प्रयत्न सफल होत आहेत, असं मोदी म्हणाले.

“जर या दहा राज्यांनी करोनावर नियंत्रण मिळवलं तर देश ही लढाई जिंकेल. करोनाच्या केसेसचे ७२ तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो,” असंही ते म्हणाले. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

आज या प्रयत्नांचे परीणाम आपण पाहत आहोत. रुग्णालयांतील उत्तम व्यवस्थापन, तसेच आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्यासारख्या प्रयत्नांचीही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे. आपल्या राज्यांत प्रत्यक्ष स्थितीवर लक्षदिल्याने जे परिणाम समोर आले आहेत. त्यातूनच यशाचा मार्ग तयार होत आहे. मला आशा आहे, की आपल्या या अनुभवाच्या ताकदीने देश ही लढाई पूर्णपणे जिंकेल आणि एक नवी सुरुवात होईल, असे मोदी म्हणाले.

 

News English Summary: PM Narendra Modi is holding a video conference meeting with Chief Ministers of various states to discuss the situation arising out of the COVID-19 pandemic. Uttar Pradesh CM Yogi Adityanath, Tamil Nadu CM EK Palaniswami, West Bengal CM Mamata Banerjee, Punjab CM Amarinder Singh, Telangana CM K Chandrasekhar Rao, Maharashtra CM Uddhav Thackeray, Gujarat CM Vijay Rupani and Bihar CM Nitish Kumar are present in the meeting.

News English Title: Prime Minister Narendra Modi Video Conference With 10 State Chief Ministers over Coronavirus Pandemic Control News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x