21 November 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

Hathras Gangrape | योगी पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? - प्रियांका गांधी

Priyanka Gandhi, CM Yogi Adityanath, Uttar Pradesh Gang rape

नवी दिल्ली, ३० सप्टेंबर : हाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? असा सवाल काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी विचारलाय.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी १९ वर्षीय दलित तरुणी आपल्या शेतात गेली होती. या ठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ कापलेली होती. तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झालेली होती. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूनंतर तिच्यावर तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून प्रियंका गांधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट टीका केलीय. ‘कुटुंबीयांकडून जबरदस्तीनं पीडितेचं शव ताब्यात घेत जाळून टाकण्याचे आदेश कुणी दिले? गेल्या १४ दिवसांपासून तुम्ही झोपलेलात का? तेव्हा तुम्ही कारवाई का केली नाही?’ असे प्रश्न विचारत प्रियांका यांना योगींना अडचणीत आणलंय.

 

News English Summary: Congress leader Priyanka Gandhi Vadra on Wednesday demanded Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath’s resignation and said he has “no moral right” to continue in the post following allegations by the Hathras gang-rape victim’s kin that police forced them to conduct her last rites. The 19-year-old Dalit woman, who died in a Delhi hospital a fortnight after she was gang-raped in Uttar Pradesh’s Hathras, was cremated in the early hours of Wednesday.

News English Title: Priyanka Gandhi shreds CM Yogi Adityanath over Uttar Pradesh Gang rape Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x