18 January 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या Business Idea | स्वतःचा उद्योग सुरु करा रतन टाटा यांच्यासोबत, 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळेल, महिना लाखोत कमाई होईल Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा
x

पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला, सुप्रीम कोर्टात धाव

P Chidambaram, Priyanka Gandhi, Salman Khurshid, Kapil Sibbal

नवी दिल्लीः आयएनएक्स मीडिया’शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ‘बेपत्ता’ झाले असून, त्यांचा मोबाइलही स्वीच ऑफ आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’) पथक रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावलीच; पण तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेऊनही चिदंबरम यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.

दिल्ली हायकोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर काँग्रेसमधील तीन ज्येष्ठ वकील चिदम्बरम यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत. अभिषेक सिंघवी, कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शीद हे तिघेही त्यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी युक्तिवाद करणार आहेत. आयएनएक्स गैरव्यवहार प्रकरणी चिदम्बरम यांना चौकशीसाठी बजावण्यात आलेल्या समन्सला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. मागील काही वर्षांपासून ते चौकशीला हजर राहतात. त्यामुळे अटक करण्याचे कोणतेही कारण नाही, असा युक्तिवाद करणार आहे.

चिदम्बरम यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जांवर जानेवारीत राखून ठेवलेला निकाल दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश न्या. सुनील गौर यांनी सकाळी जाहीर केला. निदान तीन दिवस तरी अटक न करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती चिदम्बरम यांच्या वतीने ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी केली.परंतु तीही अमान्य झाल्यावर पी. चिदम्बरम यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल व त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी वकिलांनी लगेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यावर सरन्यायाधीशांकडून तातडीने सुनावणीचे निर्देश घेण्यासाठी धावपळ केली, पण संध्याकाळपर्यंत ही याचिका कोर्टासमोर आली नव्हती. आता बुधवारी सकाळी सरन्यायाधीशांना विनंती केली जाईल.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x