22 November 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

मोदींच्या मतदारसंघातील लोकांची भीषण स्थिती मांडताच बंगला खाली करण्याची नोटीस? - सविस्तर वृत्त

Priyanka Gandhi Vadra, Vacate Lodhi Estate Govt Accommodation, SPG Cover Withdrawal

नवी दिल्ली, १ जुलै : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- 35 लोधी एस्टेटमध्ये प्रियंका गांधी या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. जवळपास २० वर्षापासून त्या याच निवासस्थानी राहत आहेत.

प्रियंका गांधी या २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय राजकारणात उतरल्या. मात्र, असं असलं तरी त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नाहीत. तरी त्यांना शासकीय बंगला देण्यात आला होता तसेच त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आलेली होती. ही सुरक्षा काही महिन्यांपूर्वी हटवण्यात आली. एसपीजी सुरक्षा असणाऱ्या व्यक्तींना शासकीय निवासस्थान दिले जाते. मात्र, सुरक्षा हटवल्यानं आता शासकीय बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र असं असलं तरी यामागील कारण दुसरंच असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. मोदी सरकारला जर त्यांना याच नियमाखाली बंगला खाली करण्याचा अधिकार होता तर तो शासकीय निर्णय तेव्हाच होणं अपेक्षित होतं जेव्हा त्यांची एसपीजी सुरक्षा हटविण्यात आली होती. मात्र प्रियांका गांधी समाज माध्यमांवर सक्रिय झाल्या असून त्यांचा विशेष जोर हा उत्तरेकडील बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या राजकारणावर असतो. त्यांनी सकाळी मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील लोकांच्या आर्थिक स्थितीबाबत पोस्ट शेअर करून प्रश्न उपस्थित केले, ज्याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली होती. त्यानंतर काही तासाने आजच्या आजचं त्यांना बंगला खाली करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा दिल्लीतील काँग्रेसच्या गोटात रंगली आहे.

 

News English Summary: Congress leader Priyanka Gandhi Vadra has been ordered to demolish a government bungalow. For this they have been given a period of 1 month. He has been ordered to demolish the government bungalow at Lodhi Road. Priyanka Gandhi Vadra will have to demolish the bungalow due to lack of SPG security.

News English Title: Priyanka Gandhi Vadra Asked To Vacate Lodhi Estate Govt Accomodation After Spg Cover Withdrawal News Latest Updates.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x