23 February 2025 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

वचन राम राज्याचं होतं, पण दिलं गुंडाराज - राहुल गांधी

Promised Ram Raj, Delivered Gunda Raj, Rahul Gandhi, Yogi Sarkar

नवी दिल्ली, २२ जुलै : उत्तर प्रदेशात एका पत्रकारावर काही जणांनी गोळीबार केल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली. यात पत्रकाराचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. “वचन राम राज्याचं होतं, पण दिलं गुंडाराज,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विक्रम जोशी यांच्या मृत्यूनंतर सरकारवर निशाणा साधला आहे. “वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज” असं म्हणत राहुल यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आपल्या भाचीसोबत होत असलेल्या छेडछेडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली. माझ्या सहवेदना शोकाकूल परिवारासोबत आहेत. वचन राम राज्याचं दिलं होतं, दिलं गुंडाराज” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दुसरीकडे पत्रकार विक्रम जोशी यांच्या हत्येप्रकरणात बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. “पूर्ण उत्तर प्रदेशात हत्या आणि महिला सुरक्षेसह गंभीर गुन्ह्यांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. यामुळे स्पष्ट होते की, उत्तर प्रदेशात कायद्याचं नाही, तर जंगलराज सुरू आहे. अर्थात उत्तर प्रदेशात करोना व्हायरसपेक्षा गुन्हेगारांचा क्राईम व्हायरस जास्त झाला आहे. सरकारनं याकडे लक्ष द्यावं,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The journalist has died and Congress leader Rahul Gandhi has castigated the BJP over the incident. Rahul Gandhi has targeted the BJP, saying, “The promise was for Ram Rajya, but I gave it to Gundaraj.”

News English Title: Promised Ram Raj Delivered Gunda Raj Rahul Gandhi Attacks Up Government News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x