8 January 2025 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

केंद्राने वीज कापली | शेतकऱ्यांकडून आत्मनिर्भर सोय | तंबुवर सोलर पावर बसवले

Protesting farmers, Ghazipur border, Solar panels installed

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: गुरुवारी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर सरकारने शेतकरी आंदोलन संपविण्याचा प्रयत्न केला आणि गाझीपूरच्या सीमेवर वीज आणि पाण्याचे तंबू तोडण्यात आले. असे असूनही, शेतकर्‍यांनी चिकाटी कायम ठेवली आहे. त्यासाठी त्यांनी तंबुवर सौर पॅनेल आणि सौर इन्व्हर्टर बसवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे समाज माध्यमांवरून सामान्य लोकांपर्यंत वास्तव पोहोचविण्यासाठी मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी बर्‍याच ठिकाणी चार्जिंग पॉईंट्सही बसवले आहेत.

भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश तिकिट यांच्या आवाहनानंतर शेतकर्‍यांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. 26 जानेवारीनंतर आंदोलन जवळजवळ संपलेले दिसत असताना गुरुवारी संध्याकाळी गाझीपूर सीमेवर शेतकरी संघटनेचे नेते राकेश तिकिट टीव्ही वाहिन्यांवर झळकले आणि त्यांच्या भावुक भाषणानंतर परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारने युद्धजन्य तयारी सुरु केली आहे.

गाझीपूर सीमेवर शेतकरी समर्थक भारतीय संघटना (बीकेयू) मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत आंदोलन करत आहे. त्यानंतर मेरठ, बागपत, बिजनौर, मुझफ्फरनगर, मुरादाबाद आणि बुलंदशहर या पश्चिम उत्तर प्रदेश जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने यूपी गेटवर पोहोचले आहेत.

 

News English Summary: Following the violence in the tractor parade on the Republic Day in Delhi on Thursday, the government tried to end the peasant movement on Thursday and tents were cut to power and water at the Ghazipur border. Despite this, farmers have not budgeted and they have started installing solar panels and solar inverter to power the picket place. Farmers have also set up charging points in many places to charge mobile phones.

News English Title: Protesting farmers at the Ghazipur border with solar panels installed on picket tents news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x