15 January 2025 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
x

३१ उपग्रह अंतराळात झेपावले आणि इस्रोचं शतक पूर्ण !

हैदराबाद : आज दिनांक १२ जानेवारी २०१८ भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने हैदराबाद मधील श्रीहरीकोटा या अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून भारताचा शंभरावा उपग्रह अंतराळात झेपावला. आज सकाळी ९ वाजून २९ मिनिटाने पीएसएलव्ही सी ४० / कार्टोसॅट २ मिशनचं यशस्वी प्रक्षेपण झालं.

आज झालेल्या प्रक्षेपणात पीएसएलव्ही सी ४० सोबत इस्रोने तब्बल ३१ उपग्रह अंतराळात यशस्वी पणे सोडले. अंतराळात सोडलेल्या एकूण उपग्रहांपैकी २८ उपग्रह हे दुसऱ्या ६ देशांचे होते, ज्यात फिनलँड, कॅनडा, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी पीएसएलव्ही सी ३९ हे मिशन अयशस्वी ठरले होते, परंतु त्यानंतर इस्रो पीएसएलव्ही सी ४० मिशन साठी पुन्हा जोमाने तयारीला लागली होती. त्या प्रयत्नांचाच निकाल म्हणजे आजचे पीएसएलव्ही सी ४० चे यशस्वी प्रक्षेपण. परंतु यापूर्वी भारताने एकाचवेळी तब्बल १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याचा विश्वविक्रम केला आहे.

इस्रोच्या या यशस्वी पीएसएलव्ही सी ४० च्या प्रक्षेपणानंतर त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हॅशटॅग्स

#PSLV(13)ISRO(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x