20 April 2025 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच शनिवार-रविवार, सुट्टीच्या दिवशी लॉकडाऊन

Punjab, Lockdown, CM Amrindar Singh

अमृतसर, १२ जून: पंजाबमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून सरकारने कडक पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने पुन्हा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु हे लॉकडाऊन-१ या प्रमाणे इतके कठोर असणार नाही.

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार पंजाबमध्ये शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन असेल. म्हणजेच शनिवार आणि रविवार तर सरकारी सुट्टीच्या दिवशी दुकाने उघडली जाणार नाहीत. याशिवाय राज्यात वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आठडयाच्या अखेरीस आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी निर्बंध अधिक कठोर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ईपास धारकांनाच प्रवासाची परवानगी दिली आहे. वैद्यक क्षेत्र आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वांना ईपास डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्लीहून पंजाबमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी बंधनकारक करण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे. दिल्लीहून पंजाबमध्ये दररोज ७०० ते ८०० गाडया येतात. चेन्नईमधील वाढत्या रुग्ण संख्येवर मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. एकटया चेन्नई शहरामध्ये का लॉकडाउन केले जाऊ शकत नाही? असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडू सरकारला विचारला.

 

News English Summary: The government has taken stern action in view of the growing outbreak and crisis of Corona virus in Punjab. The Punjab government has again announced a lockdown to stay safe from Corona. But it won’t be as severe as Lockdown-1.

News English Title: Punjab state imposes- complete lockdown on weekends and public holidays News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या