5 February 2025 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

राफेल विरोधातील सर्व फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

Rafael Deal, Rahul Gandhi, Chowkidar Chor Hai, PM Narnedra Modi

नवी दिल्लीः केंद्र सरकारने फ्रान्स खरेदी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिलीय. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) फेटाळून लावल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने राफेलवरील याचिंकावर सुनावणी केली. या सुनावणीत पीठाने राफेल विमान खरेदी (Rafael Fighter Jet Deal) वैध ठरवत याचिका फेटाळून लावल्या. यासोबतच राफेल व्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी करण्याच्या मागणीही कोर्टाने फेटाळली.

फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन (French Dassault Aviation Rafael) कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सुप्रीम कोर्टात गुरूवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. दरम्यान, राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात मागितलेली माफी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. तसंच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं पंतप्रधानांविरोधात केलेली चौकीदार चोर हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण होतं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

सुप्रीम कोर्टाने राफेलबाबत निकाल देऊनही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ‘लीक’ दस्तावेजांचा दाखला देत आरोप करण्यात आला होता की या करारात पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला अंधारात ठेवून हा व्यवहार केला होता. शिवाय विमानाच्या किमतीवर आक्षेप घेतही याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु कोर्टाने या सर्व याचिकाही फेटाळून लावल्या.

राफेल डील प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. मागील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला धक्का दिला होता. त्यावर भाष्य करताना ‘आता सुप्रीम कोर्टा देखील म्हणतंय चौकीदार चोर है,’ अशी प्रतिक्रिया देत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) निशाणा साधला होता. त्यावर भारतीय जनता पक्षानं तीव्र आक्षेप घेतला होता. सुप्रीम कोर्टानं असं कोणतंही विधान केलेलं नाही. तरीही राहुल गांधी असं विधान करुन कोर्टाचा अवमान करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर राहुल यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला होता. राफेल करारात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा डिसेंबर २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु, यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

हॅशटॅग्स

#RafaelDeal(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x