15 January 2025 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

राहुल गांधींकडून सचिन पायलट यांना चर्चेसाठी निमंत्रण

Rahul Gandhi, invites Sachin Pilot, Rajasthan crisis

नवी दिल्ली, १२ जुलै : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी सीएम अशोक गहलोत यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. पण या बैठकीला सचिन पायलट उपस्थित नव्हते. सध्या ते दिल्लीत आहेत. राजस्थानचे जवळपास १० आमदार दिल्लीत आहेत.

दुसरीकडे राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना चर्चेसाठी बोलावले आहे. संध्याकाळी ५.३०च्या सुमारास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत काय होणार, यावर राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे भविष्य अवलंबून आहे.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पायलट या बैठकीला जातील की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. पायलट या बैठकीला गेले तर या सगळ्या नाराजी नाट्यावर पडदा पडेल. मात्र, सचिन पायलट या बैठकीला गेले नाहीतर ते आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi has summoned Sachin Pilot for a discussion on the backdrop of political turmoil in Rajasthan. A meeting between the two leaders will be held at around 5.30 pm.

News English Title: Rahul Gandhi invites Sachin Pilot to discuss Rajasthan crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x