22 January 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

या कायद्याने शेतकरी बाजार नष्ट होतील | मग MSP कशी मिळणार | MSP ची खात्री का नाही

Rahul Gandhi, PM Narendra Modi, Agriculture Bill Ordinances, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २० सप्टेंबर : अखेर राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले आहेत.

वादग्रस्त ठरलेले शेती विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. एकीकडे विरोधकांनी जोरदार विरोध केला तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सरकारने विधेयक मंजूर करणारच रेटा लावून धरला. अखेर राज्यसभेत मोठ्या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयकांवर मतदान घेऊन मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या विधेयकांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारकडून मांडण्यात आलेल्या कृषि विषयक विधेयकावर राज्यसभेत प्रचंड गदारोळ सुरू असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधला. राहुल गांधी यांनी दोन प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याची टीका केली.

“मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार?, एमएसपीची खात्री का नाही? मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

 

News English Summary: As the parliamentarians debate the new agriculture-related ordinances in Rajya Sabha, Congress leader Rahul Gandhi launched a scathing attack at the Narendra Modi government saying that the Prime Minister wants to make farmers slaves of capitalists. Taking to Twitter, the Congress leader termed the new bills -‘anti-agriculture ‘black law’ of Modi government’ and said that the country will never allow them to come into force.

News English Title: Rahul Gandhi Narendra Modi Prime Minister Modi Govt Farmer Bill Agriculture Bill Ordinances Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x