22 January 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

मोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली | राहुल गांधींचं टीकास्त्र

Rahul Gandhi, PM Narendra Modi, Rajnath Singh, India China Ladakh, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर : भारत-चीन सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर वारंवार विविध प्रकारे चीन भारतील सैन्याला त्रास देत आहे. त्यानंतर केंद्र सरकारने चीनला धडा शिकवण्याच्या सर्व योजना आखल्या आहेत. या विवादादरम्यान आज संसदेच्या अधिवेशनात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या रक्षणासाठी विविध योजना सुरू असल्याचे सांगितले. चीनला विविध प्रकारे धडा शिकवला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यादरम्यान काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मा. राजनाथजी देश सैन्यासोबत एकजूट आहे…मात्र हे सांगा…चीनने आमच्या जागेत कब्जा करण्याचं धाडस कसं काय केलं? मोदींनीं चीनद्वारे देशाच्या सीमेत घुसखोरी करण्याबाबत गोंधळ का निर्माण करण्यात आला? चीनला देशातून केव्हा बाहेर काढणार?

दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रश्नही विचारले आहेत. “संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालंय की, मोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली. आपला देश नेहमी लष्करासोबत उभा होता आणि राहिल. पण, मोदीजी, आपण केव्हा चीनविरोधात उभे राहणार आहात? चीनकडून आपल्या देशाची जमीन कधी परत घेणार? चीनचं नाव घ्यायला घाबरू नका,” असा उपरोधिक टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे.

 

News English Summary: After Rajnath Singh briefed Parliament, Rahul Gandhi accused the Prime Minister of misleading the country. Rahul Gandhi also tweeted and asked questions. It is clear from the information given by the Defense Minister that Modiji misled the country about China’s infiltration.

News English Title: Rahul Gandhi PM Narendra Modi Rajnath Singh India China Stand Off Ladakh Border Tension Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x