मोदींनी २ कोटी रोजगाराची स्वप्नं दाखवून, १४ कोटी तरुणांना बेरोजगार केलं - राहुल गांधी

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधींनी आता बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 9 ऑगस्ट रोजी युवा कॉंग्रेस स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील तरुणांना वचन दिले होते की, 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून मिळेल. प्रत्येक वर्षी एक मोठे स्वप्न दाखवले. पण अखेर सत्य बाहेर आलेच. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी म्हणतात, हे का झालं, तर चुकीच्या धोरणांमुळेच झाले. नोटाबंदी, चुकीचा जीएसटी आणि नंतर लॉकडाऊन केलं. या तिन्ही घटकांनी भारताची रचना, आर्थिक संरचना नष्ट केली. आता सत्य हे आहे की, भारत यापुढे मोदी सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. म्हणूनच युवक कॉंग्रेस मैदानात उतरत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, युवक कॉंग्रेस प्रत्येक शहरात, प्रत्येक रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित करणार आहे, याचा मला आनंद आहे. युवक कॉंग्रेस बेरोजगारीचा मुद्दा लावून धरणार आहे. राहुल गांधींनी लोकांना आवाहन केले आहे की, तुम्ही सर्वांनी ‘रोजगार दो’ मोहिमेमध्ये सामील व्हा आणि देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युवक कॉंग्रेसबरोबर काम करावे.
दरम्यान, चीनकडून कथित सीमा उल्लंघन प्रकरणाचं वादळ काही काळ शांत झालेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, “आपल्याला आता खोटेपणाचा कचरा देखील देशातून साफ करायला हवा.”
पीएमओनं नुकतचं ट्विट करुन कचरामुक्त भारत मिशनमध्ये सामिल होण्याचे आवाहन जनतेला केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “का नाही? आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील खोटेपणाचा कचरा देखील साफ करायला हवा. यासाठी पंतप्रधान आता चीनने आपल्या जमिनीवर कब्ज केलाय की नाही ते सांगून हा सत्याग्रह सुरु करतील का?”
News English Summary: When Narendra Modi became the Prime Minister, he had promised the youth of the country that 2 crore youth would get employment. Every year showed a big dream. But in the end, the truth came out. Rahul Gandhi has also alleged that 14 crore youth have become unemployed due to Narendra Modi’s policies.
News English Title: Rahul Gandhi unemployment Modi government youth congress economic crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB