21 January 2025 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा
x

रेल्वे आंदोलन मागे घेऊन प्रशिक्षणार्थी राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : आज सकाळ पासूनच रेल्वे प्रशिक्षणार्थींनी रेल-रोको केल्यानंतर अखेर तीन तासानंतर आंदोलन मागे घेऊन, आपले प्रश्न मांडण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली. तसेच प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे रेल्वे आंदोलकांना आश्वासन दिले.

रेल्वे आंदोलन मागे घेतल्यानंतर आंदोलकांनी काही वेळापूर्वी राज ठाकरे यांची एमआयजी क्लबवर भेट घेतली. या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला असून राज ठाकरे यांनी त्यांच्या नक्की काय मागण्या आहेत ते समजून घेतले.

रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्या रास्त असल्याचं सांगून काही आंदोलनकर्त्यांना घेऊन आमच्या पक्षाचे नेते दिल्लीला जाऊन, रेल्वे मंत्र्यांची भेट घेतील आणि विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतील असं आश्वासन मनसे अध्यक्ष भेट घेण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना दिल आहे.

मनसेच्या वतीने संदीप देशपांडे आणि काही कार्यकर्ते रेल्वे आंदोलनस्थळी पोहोचले होते आणि पाठिंबा दर्शवून आम्ही तुम्हाला इथे पाठिंबा देण्यास आलो आहोत असे विश्वासाने सांगितले. परंतु त्यांच्या मागण्यांची रेल्वे प्रशासन काहीच दखल घेत नसल्याने आंदोलक त्यांच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. रेल्वे अधिकारी केवळ प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यात व्यस्त असल्याचे संदीप देशपांडे म्हणले आणि त्यामुळेच रेल्वे अधिकाऱ्यांनी तसे का करता घटनास्थळी येऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करावी अशी विनंती केली होती.

हॅशटॅग्स

#Rail Roko(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x