21 November 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राजस्थान सरकार पाडण्याचं षडयंत्र, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

Rajasthan Congress, Randeep Surjewala, Audio Clip, MLAs Vishvendra Singh, Bhanwaralal Sharma

जयपूर, १७ जुलै: राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजपावर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत राजस्थान सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचं सुरजेवाला म्हणाले आहेत. अशा वेळी त्यांच्याविरोधात त्वरित एफआयआर दाखल झाले पाहिजे आणि अटक करण्यात यावी, अशी मागणीही सुरजेवालांनी केली आहे. याबाबत SOG’कडे तक्रार दाखल केली आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने दोन आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.

“गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेस पक्षाकडून रद्द करण्यात आलं आहे. पक्षाने त्यांना काऱणे दाखवा नोटीसही बजावली आहे. संजय जैन आणि भवरलाल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. आमदारांना देण्यासाठी काळा पैसा कुठून आणला याचाही तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. मात्र, रणदीप सुरजेवाला यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. काल रात्री सचिन पायलट यांनी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याशी चर्चा केली. सचिन पायलट यांना कॉंग्रेस पक्षाने परत येण्यास सांगितले आहे, तसेच हे प्रकरण येथे थांबवलं जाईल, असे आश्वासनही दिले आहे. विशेष म्हणजे पायलट यांना पूर्वीची पदे परत मिळणार नाहीत. परंतु त्यांना केंद्रीय नेतृत्वात स्थान मिळेल.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये ?
भवरलाल शर्मा यांनी ३० आमदारांची संख्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे एक नाही तर तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत ज्यामध्ये पैशांची चर्चा असल्याचाही दावा आहे. भवरलाल जेव्हा पैशांसंबंधी विचारतात तेव्हा समोरील व्यक्ती जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल आणि वरिष्ठतेसंबंधीही काळजी घेतली जाईल असं सांगत आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीने ही ऑडिओ क्लिप चालवली आहे. याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीदेखील घोडेबाजार केला जात असून आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे.

 

News English Summary: Congress spokesperson Randeep Surjewala has attacked the Modi government at a press conference. Citing two viral audio clips, Union Minister Gajendrasingh Shekhawat has said that Surjewala is plotting to overthrow the Rajasthan government.

News English Title: Rajasthan Congress Randeep Surjewala On Audio Clip Mlas Vishvendra Singh And Bhanwaralal Sharma Suspended News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x