23 November 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या आमदारांकडून राजभवनातच निदर्शनं सुरू

Rajasthan Political Crisis, Congress MLAs, Sit On A Protest, Inside Raj Bhawan, CM Ashok Gehlot, Sachin Pilot

जयपूर, २४ जुलै : राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत सर्व आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले असून, काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शनं सुरू केली आहेत. “उद्या राज्यातील जनतेने राजभवनाला घेराव घातला, तर आमची जबाबदारी नाही,” असा इशाराही गेहलोत यांनी दिला होता. काँग्रेसच्या मागणीनंतर राज्यपालांनी अधिवेशन बोलण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शनं सुरू केली आहेत. बहुमत चाचणी घेण्यासाठी सोमवारपासून अधिवेशन बोलवावं अशी मागणी आमदारांनी केली आहे.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी म्हटले आहे, की सध्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे आमदार कोरोना कोरोना व्हायरसने ग्रस्त आहेत. अशात विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही. अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत. अशा स्थितीत, तत्काळ विधानसभा अधिवेश बोलावण्याच्या आणि बहुमत सिद्ध करण्याच्या मुद्द्यावरून, अशोक गेहलोत सरकार सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्या राज्यपालांकडून विधानसभा अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

 

News English Summary: After the governor’s refusal, Chief Minister Gehlot entered the Raj Bhavan with all the MLAs and the Congress MLAs started protesting at the Raj Bhavan. “If the people of the state besiege the Raj Bhavan tomorrow, it is not our responsibility,” Gehlot had warned.

News English Title: Rajasthan Political Crisis Congress MLAs Sit On A Protest Inside Raj Bhawan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x