बंडाच्या विमानाचं लँडिंग | सचिन पायलट अखेर स्वगृही परतले

जयपूर, ११ ऑगस्ट : राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे प्रकरण निकाली काढल्यानंतर सचिन पायलट म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी मुद्दे उपस्थित करणे आवश्यक होते, पदाची तळमळीने नव्हे तर सन्मानाची लढाई. ३२ दिवसानानंतर पायलट अखेर राजस्थानात घरी परतले आहेत. आता पायलट यांचे जयपूरमध्ये आगमन कधी होणार याची उत्सुकता आहे. राजस्थान कॉंग्रेस सांगत आहे की, सचिन लवकरच आपल्या घरी परत येतील.
पायलट यांनी शनिवारी प्रियांका गांधी वाड्रा यांना फोन करून आपला काँग्रेस सोडणार नसल्याचा इरादा नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर प्रियांका यांनी पुढाकार घेऊन पायलट आणि राहुल गांधी यांची आज दुपारी भेट घडवून आणली. या बैठकीला त्याही स्वत:ही हजर होत्या. सुमारे एक तास चाललेल्या चर्चेअंती पायलट काँग्रेसमधून बाहेर पडणार नाहीत आणि अधिवेशनाला हजर राहून गेहलोत सरकारला पाठिंबा देतील, हे स्पष्ट झाले. कोणत्याही परिस्थितीत अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले जाणार नाही, असे पायलट यांना सांगण्यात आले आहे.
बंडाआधी पायलट यांच्याकडे उपमुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद होते. त्यांना उपमुख्यमंत्रीपद पुन्हा मिळू शकेल, पण प्रदेशाध्यक्ष केले जाणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र केंद्रीय पक्ष संघटनेत त्यांना महत्त्वाचे स्थान देण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून, त्यावर त्यांनी मत व्यक्त केलेले नाही. पायलट यांच्यासह बंडात सहभागी झालेल्यांपैकी काहींना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.
News English Summary: The crisis of the Congress in Rajasthan is over. Sachin Pilot, who is flying the flag of rebellion, has agreed to work with Chief Minister Ashok Gehlot. After settling the matter, Sachin Pilot said that it was necessary to present issues in the interest of the party, not for the sake of position but for the sake of honor.
News English Title: Rajasthan political crisis ends prodigal Pilot returns after meeting Rahul Gandhi News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON