गहलोत यांना हटवा! सचिन पायलट समर्थकांची मागणी...अन्यथा समर्थन नाही

नवी दिल्ली, १४ जुलै : राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास पायलट यांनी नकार दिला आहे. पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची रीघ लागली आहे. तर दुसरीकडे पायलट समर्थकही गहलोत यांच्या विरोधात उतरले आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसमधील राजकीय नाट्याने नवीन वळण घेतले आहे. अशोक गहलोत यांनी बहुमतासाठी 105 आमदाराचा पाठिंबा असल्याचं सिद्ध केल्यानंतर सरकार स्थिर राहणार असे स्पष्ट झाले होते. पण, त्यानंतर सचिन पायलट आणि त्यांनी समर्थकांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा करून मनधरणीचा प्रयत्न केला. पण, पायलट यांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. पायलट यांनी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यास स्पष्ट नकार दिली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, पण गहलोत यांना मुख्यमंत्रिपदी ठेवू नका, अशी मागणीच पायलट यांनी केली आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची सोमवारी बैठक घेतली, यात १०६ आमदार असल्याचा दावा केला, त्यानंतर या सर्व आमदारांना जयपूरच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आलं. पण अद्यापही राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरचं संकट हटलं नाही. कारण जवळपास २२ आमदार हॉटेलमध्ये नाहीत. आज पुन्हा काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक पार पडणार आहे.
दरम्यान सचिन पायलट यांच्या ग्रुपमध्ये आलेल्या व्हिडीओत आमदार इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीणा दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी फॅमिली असा उल्लेख केला आहे. मुकेश भाकर यांनी सांगितले की, काँग्रेसशी प्रामाणिकपणा याचा अर्थ अशोक गहलोत यांची गुलामी आहे, हे आम्ही सहन करणार नाही. सचिन पायलट यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे ३० काँग्रेस आमदारांचे समर्थन आहे. काही अपक्ष आमदारही सचिन पायलट यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा दावा फेटाळत जर सरकारकडे बहुमत असेल तर त्यांनी सभागृहात ते सिद्ध करावं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नाही असं सचिन पायलट यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे.
News English Summary: In Rajasthan, the second phase of the mutiny called by Deputy Chief Minister Sachin Pilot has now begun. The pilot has refused to accept Gehlot as chief minister. The Congress leaders are trying to persuade Pilot.
News English Title: Rajasthan political crisis remove Ashok Gehlot from CM post demands Sachin Pilot News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA