24 November 2024 5:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

पक्षासाठी झटलो आम्ही आणि फक्त अनुभवाच्या आधारावर गेहलोत यांना मुख्यमंत्री पद दिलं - सचिन पायलट

Rajasthan Political Crisis, Sachin Pilot, Chief Minister Ashok Gehlot, Congress, BJP

जयपूर, १५ जुलै : बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली असून उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावर हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली असून यावेळी प्रथमच आपल्या नाराजीवर जाहीर भाष्य केलं आहे. “आपण पक्षासाठी इतकं काम केलेलं असतानाही फक्त अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला.

पुढे सचिन पायलट यांनी सांगितले की, राजस्थानच्या विकासासाठी माझ्या कामात नेहमी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अडथळे आणले. अधिकाऱ्यांना मी दिलेले आदेश मानू नका अशा बजावण्यात आलं होतं. त्यामुळे अशाप्रकारे माझी अडवणूक होत असेल तर उपमुख्यमंत्रिपदाचा काय फायदा आहे, जर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करु शकत नाही. याच मुलाखतीत पायलट यांनी समर्थकांना विकासाची संधीही दिली नाही असं सांगितले.

त्याचसोबत अशोक गहलोत यांच्याशी नाराजीची कारणं काय या प्रश्नावर उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले, मी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी नाराज नाही, इतकचं नाही तर मी काही विशेष ताकदही मागितली नव्हती. फक्त जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण व्हावीत हीच माझी अपेक्षा होती. तसेच बंडखोरीचा पवित्रा घेण्यापूर्वी त्यांनी पक्षात चर्चा का केली नाही? या प्रश्नावरही सचिन पायलट यांनी उत्तर दिलं. काँग्रेस पक्षात अंतर्गत चर्चा करण्यासाठी कोणतंही व्यासपीठ राहिलं नाही, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी काहीच केले नाही असा आरोप त्यांनी केला.

 

News English Summary: In an interview to India Today, Sachin Pilot has, for the first time, publicly expressed his displeasure. “Even though we have done so much for the party, Ashok Gehlot claimed the post of Chief Minister only on the basis of experience.

News English Title: Rajasthan Political Crisis Sachin Pilot On Chief Minister Ashok Gehlot Congress News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x