23 February 2025 2:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अवघी अयोध्या नगरी सजली, सर्वत्र उत्साहाचे वातावरण

Ram Mandir, Atmosphere of excitement, in Ayodhya

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.

असं सांगितलं जात आहे की, महंत नृत्य गोपाळ दास यांनी मणि राम दास छावनी पीठ यांच्यातर्फे राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी ४० किलोची चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. महंत कमल नयन दास, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दासचे उत्तराधिकारी आहेत. मणि राम दास छावनी पीठ हे महंत नृत्य गोपाल दास यांचं निवास स्थान आहे. अयोध्येतील सर्व प्रमुख धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा याच ठिकाणाहून आखण्यात येते.

केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे.

 

News English Summary: Bhumi Pujan program has started for the construction of a grand temple of Lord Rama in Ayodhya. Prime Minister Modi will lay the foundation stone of Ram Mandir at 12.40 pm at Ram Janmabhoomi. Prime Minister Modi will reach Ayodhya at 11.30 am.

News English Title: Ram Mandir an atmosphere of excitement in Ayodhya News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x