5 November 2024 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

राम जन्मभूमी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आडवाणी आणि जोशींची अनुपस्थिती

Ram Mandir , Ayodhya Bajarangdal, Vinay Katiyar, Advani And Joshi

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या कार्यक्रमाला भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि या नेत्यांचं वय पाहून त्यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरून भाजपाचे माजी खासदार विनय कटियार यांनी नाराजी व्यक्त केली.

लालकृष्ण आडवाणी यांची राम जन्मभूमी आंदोलनात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढण्यात आली होती. आडवाणी, जोशी यांच्यासह उमा भारती यांचंही राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीवर हल्ला झाला. त्यानंतर न्यायालयात खटला दाखल झाला. त्यात या तिन्ही नेत्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

 

News English Summary: LK Advani has played a very important role in the Ram Janmabhoomi movement. A rath yatra from Somnath to Ayodhya was organized under his leadership. Along with Advani and Joshi, Uma Bharti has also made a significant contribution to the Ram Mandir movement.

News English Title: Ram Mandir Ayodhya Bajarangdal Leader Vinay Katiyar Said Efforts Should Be Done For Calling Advani And Joshi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x