18 November 2024 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक

Uttar Pradesh Assembly Election 2022

नवी दिल्ली, ०४ जून | कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भाजपची विश्वासार्हता कशी वाढवता येईल यावर भर दिला जाणार आहे.

ही बैठक शनिवारी दिल्लीत होणार असून यामध्ये संघातील दहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रेय होसाबाळे, कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहे. हे सर्व नेते सध्या दिल्लीत पोहचले असून ते उद्याच्या बैठकीत संदर्भांत विचारमंथन करीत आहे.

या 4 प्रमुख मुद्यांवर होत आहे विचारमंथन:

  1. बंगाल निवडणुकीतील पराभव, राज्यात हिंदूवर होणारे अत्याचार आणि बंगालमध्ये सुरु असलेल्या विचार युद्धांची दिशा काय असेल?
  2. उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेली राजकीय गतिरोध कमी करणे. पंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला?
  3. कोरोनाकाळात मोदी सरकारची विश्वासार्हता का कमी झाली? सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले का? केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केल्याने पक्षाला काय फायदा होईल?
  4. केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा, कित्येक राज्यांत भाजप नेत्यांना गावात प्रवेश दिला जात नाही.

 

News English Summary: The Modi government is currently on the backfoot on many issues like the Corona epidemic, farmers’ agitation and inflation. Therefore, the credibility of the Modi government is also declining. At the same time, it is facing constant criticism from the opposition. In the background, the BJP’s mother wing, the Rashtriya Swayamsevak Sangh, has taken the initiative.

News English Title: Rashtriya Swayamsevak Sangh called meeting over BJP political crisis before Uttar Pradesh Assembly Election 2022 news updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x