22 November 2024 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊसच्या रेकी काढल्या | ATS'ने तिघांना ताब्यात घेतलं

Reiki, CM Uddhav Thackeray, farm house, ATS, Marathi News ABP Maza

रायगड, 9 सप्टेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली. मुबंई दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) नवी मुबंई टोल नाक्यावर आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेली माहिती अशी की, खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी टुरीस्ट कारने काही लोक रेकी करण्यासाठी आले होते. 3 ते 4 जण होते. फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे या इम्तियाज नावाच्या व्यक्तीची चौकशी केली आणि नंतर कार मुबंईकडे रवाना झाली. घटनेचं प्रसंगावधान राखून फार्म हाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडी नबंर नोट करून तातडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुबंई पोलिसांना कळवला. या घटनेची दखल घेत मुबंई ATSनं कार नवीमुबंई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून आरोपींची ATS कडून कसून चौकशी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?
फार्महाऊसच्या दिशेने निघालेल्या सुरक्षारक्षकाकडे या तरुणांनी ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली. सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. मात्र ड्युटीवर आलेल्या सुरक्षारक्षकापाठोपाठ हे तरुण तिथे पोहोचले आणि “माहिती असूनही खोटे का सांगितले?” असे विचारत तक्रारदार सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असा आरोप आहे.

बंगल्याची पाहणी करुन तिघे जण मुंबईकडे निघाले, तेव्हा फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीची पावले उचलत कार नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून या तिघा जणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे.

एटीएसने या तिघांना रायगड पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर खालापूर पोलीस स्टेशनला तिघांना हजर करण्यात आले. खालापूर न्यायालयासमोर त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले. तिघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.

दरम्यान, खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूरला एटीएससोबत तपास कार्यात आहेत.

 

News English Summary: The Raigad police Wednesday arrested three people for allegedly trespassing Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray’s farmhouse at Khalapur in Raigad. Police said that two of them posed as reporters from a leading news channel and had allegedly manhandled and threatened the security guards after illegally entering the premises. According to the officials, the incident took place at around 7.30 pm on Tuesday.

News English Title: Reiki of Chief Minister Uddhav Thackeray farm house in the possession of ATS Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x