रेमडेसिवीर वाद हायकोर्टात | महाराष्ट्रातील एकूण रुग्ण आणि पुरवठ्यातील तफावतीवरून कोर्टाने केंद्राला झापलं
मुंबई, १९ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता या वादात उच्च न्यायालयाने उडी घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. यात कोर्टाने म्हटले की, राज्यांमध्ये रेमटेसिवीर वितरणाचा काय आधार आहे ? एकट्या महाराष्ट्रात एकूण रुग्ण संख्येच्या 40% रुग्ण असून राज्याला मुभलक इंजेक्शन का मिळत नाहीत ? महाराष्ट्राला तेवढे इंजेक्शन मिळण्याचा अधिकार आहे.
यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही खडसावले आहे. कोर्टाने म्हटले की, अनेक जिल्ह्यांमध्ये मनमर्जीप्रमाणे रेमडेसिवीर वितरीत केले जात आहेत. याशिवाय कोर्टाने राज्य सरकारला विचारले की, 13 आणि 18 एप्रिल रोजी नागपुरला रेमडेसिवीरचे एकही इंजेक्शन का पाठवण्यात आले नाही ?
यासंदर्भात कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने, राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्या आधारे वाटले जात आहे? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. तसेच, एकट्या महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत 40टक्क्यांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे त्यांना रेमडेसिवीरदेखाल त्याच प्रमाणात मिळायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यासंदर्भात, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाही फटकारले आहे. जिल्ह्यांना योग्य पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होत नाही, असे म्हणत, राज्य सरकारने 13 एप्रिल आणि 18 एप्रिलला नागपूरात रेमडेसिवीरची एकही कुपी का पाठवण्यात आली नाही? असा सवालही केला आहे.
कोर्टाने म्हटले आहे, की आम्ही FDA’च्या जॉइंट डायरेक्टरसोबत बैठक केली. त्यांनी सांगितले, की राज्य पातळीवर एक समिती आहे. ही समिती राज्यांसाठी कुप्यांची संख्या निश्चित करते. सध्या 7 कंपन्या देशात रेमेडेसिविर औषधाचा पुरवठा करत आहे. परिस्थिती पाहता, जेथे कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा शहरांना कंपन्यांनी अधिक रेमडेसिवीर द्यायला हव्या. यात नागपूरचाही समावेश आहे. यासाठी सरकार कंपन्यांना निर्देश देऊ शकते.
30% रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला मिळायला हवे:
या प्रकरणात ‘एमिकस’ला सामील करण्यात आले आहे. हे कायद्याचे जानकार असतात, ज्यांचा प्रकरणाशी थेट संबंध नसतो, पण ते न्यायालयाला मदत करतात. एमिकसने कोर्टाला सांगितले की, एफडीए रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराची चौकशी करू शकतात. महाराष्ट्रातील वाढता संसर्ग पाहता 30% रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला मिळायला हवेत.
रेमडेसिवीरचे योग्य वितरण होत नाही
कोर्टाने म्हटले की, कोविड -19 मुळे परिस्थिती खूप खराब झाली आहे. सध्या जीव वाचवणाऱ्या औषधाची कमतरता आहे. ऑक्सीजन वेळेवर मिळत नाहीये, मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफदेखील कमी आहे. नागपुरात विषाणूचा स्ट्रॉन्ग व्हेरिएंट दिसत आहे. ठाण्यात 2,448 कोरोना बेडवर 5,328 रेमडेसिवीर वायल दिले, पण नागपुरात 8,232 बेडच्या तुलनेत फक्त 3,326 रेमडेसिवीर दिले. ही वितरणाची पद्धत समजण्यापलीकडची आहे. राज्याची समिती रेमेडेसिवीरचे योग्य वितरण करत नाहीये.
News English Summary: The number of corona patients in Maharashtra is increasing day by day. This is due to the fact that Corona patients do not get the injectable remedesivir, which is a good match between the ruling party and the opposition. Now the High Court has jumped into the controversy. The Nagpur bench of the Bombay High Court has sent a notice to the Center. In it, the court said, what is the basis for the distribution of Remtesivir in the states? Maharashtra alone accounts for 40% of the total patient population and why does the state not get free injections? Maharashtra has the right to get so many injections.
News English Title: Remedesivir injections issue is moved in Mumbai high court news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL