22 February 2025 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

VIDEO | अर्णब गोस्वामींची फेक पत्रकारिता आणि फेक दावे पुन्हा जगासमोर | असे पुन्हा तोंडघशी पडले

Arnab Goswami

नवी दिल्ली, २० सप्टेंबर | मागील आठवड्यात रिपब्लिकवर, अर्णब गोस्वामीचा प्राइमटाइम शोमधील तालिबानसंबंधित “Taliban-Split” नावाने मोठी चर्चा झाली.अर्णब गोस्वामी यांनी दावा केला की तालिबान “तुटला आहे”, कारण त्याचे सहसंस्थापक मुल्ला बिरादार यांनी हक्कानी नेटवर्कशी काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता असं सांगण्यात आलं.

VIDEO, अर्णब गोस्वामींची फेक पत्रकारिता आणि फेक दावे पुन्हा जगासमोर, असे पुन्हा तोंडघशी पडले – Republic TV Arnab Goswami again exposed in Prime Time show during Taliban Split talked :

धक्कादायक म्हणजे कार्यक्रमादरम्यान गोस्वामी यांनी एका धक्कादायक दावा केला आणि त्याची चर्चा देशात आणि नंतर जगभर पसरली आहे. अर्णब गोस्वामीने शो दरम्यान थेट दावा केला कि, ‘पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी काबूलमधील सेरेना हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर थांबले होते. रिपब्लिकच्या “गुप्तचर सूत्रांचा” हवाला देखील त्यांनी चर्चेत दिला. त्यांनी पुढे थेट स्वतःच्या सूत्रांच्या माहितीवरून “पाकिस्तानी अधिकार्‍यांनी रात्रीच्या जेवणासाठी काय खाल्लं” याचा देखील तपशील शो दरम्यान दिला.

अर्णब गोस्वामींच्या शोमधील पॅनेलिस्टपैकी एक, पीटीआयचे प्रवक्ते अब्दुल समद याकूब यांनी गोस्वामींना त्यांच्या सूत्रांविषयी प्रश्न विचारले. त्यावर गोस्वामी म्हणाला, “तुम्ही आज जाऊन तपासा … सेरेना हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर, मी तुम्हाला सांगत आहे, कृपया तपासा, काबूलमधील सेरेना हॉटेलचा पाचवा मजला, तेथे किती पाकिस्तानी सैन्य अधिकारी आहेत?” असा ठामपणे दावा केला.

त्यानंतर पीटीआयचे प्रवक्ते अब्दुल समद याकूब गोस्वामीला गोस्वामींना सांगितले की सेरेना हॉटेलमध्ये पाच नव्हे तर फक्त दोन मजले आहेत आणि त्याची खात्री त्यांनी स्वतःच्या सुत्रांमार्फत केल्याचा दावा केला आणि समाज माध्यमांवर काबूलमधील सेरेना हॉटेलचे फोटो झळकले आणि अर्णब गोस्वामी किती फेक न्यूज आणि चुकीचे दावे छातीठोकपणे करतात ते जगासमोर पुन्हा उघड होण्यास सुरुवात झाली.

विशेष म्हणजे आपण पकडले गेल्याच समजताच गोस्वामी म्हणाले आनंदाची बातमी आहे, तर तुम्हाला माहिती आहे की ते सेरेना हॉटेलमध्ये आहेत. तुम्ही हॉटेलला फोन केला आणि तुम्ही त्याची पुष्टी केली. मी तुमच्याविरुद्ध एक युक्ती खेळली आणि पाचव्या मजल्यावर सांगितले. पण त्यावर हास्यास्पद किस्सा घडला होता आणि त्याच चर्चेत अर्नबचं पुन्हा हसू झालं. कारण गोस्वामींना उत्तर देताना याकूबने उत्तर दिले की त्याने Google वर माहिती तपासली आहे. पण त्याआधीच गोस्वामी म्हणाले होते, तुम्ही हॉटेलला फोन केला आणि तुम्ही त्याची पुष्टी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Republic TV Arnab Goswami again exposed in Prime Time show during Taliban Split talked.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ArnabGoswami(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x