5 November 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

ब्रेकिंग-न्युज: शाहीन बागमध्ये घुसणारी बुरखाधारी महिला आणि मोदी एकमेकांचे फॉलोअर

Delhi Police, Gunja Kapoor, Burkha,PM Narendra Modi

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनात बुरखा परिधान करून आंदोलकांवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या यूट्यूबवरील राजकीय विश्लेषक गुंजा कपूरला महिला आंदोलकांनी घेरून तिची खरी ओळख उघड केल्यामुळे खळबळ माजली होती. दिल्ली पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले होतं.

मागील आठवड्यात तीनवेळा गोळीबाराच्या घटना घडलेल्या शाहीनबागमधील आंदोलकांना बुधवारी एक बुरखाधारी महिला खूप जास्त प्रश्न विचारत असल्याचे जाणवल्यामुळे तिच्याविषयी संशय निर्माण झाला होता. त्यानंतर काही आंदोलकांनी तिची झडती घेण्याची मागणी केली आणि महिला आंदोलकांनी तिला पकडले. तिची झाडाझडती घेतली असता तिच्यापाशी कॅमेरा असल्याचे आढळून आले. या कॅमेऱ्याने ती गुप्तपणे व्हिडीओ तयार करीत होती, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेऊन सरिता विहार पोलिस ठाण्यात नेले. तिथे तिची गुंजा कपूर म्हणून ओळख पटली.

दरम्यान, शाहीन बागच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि आपवर हल्लाबोल केला होता. शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट असल्याचा आरोप मोदींनी केला होता. तसेच दिल्लीच्या लोकांना विकासासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे होतं. केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे. दिल्लीतल्या लोकांनी परिवर्तनाचं मन बनवलं असून, सर्वच स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत मोदींनी दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला होता.

मात्र गुंजनही भाजपा समर्थक असून ती स्तंभ लेखिका असण्याबरोबरच युट्यूबवरील ‘द राईट नरेटीव्ह’ हे चॅनेलही चालवते. ती स्वत:ला भारताला विश्वगुरु बनवण्यासाठीची कार्यकर्ता असल्याचं सांगते. धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुंजनला ट्विटवर फॉलो करत असल्याची माहितीही समोर आली आहे. बंगळुरुमधील खासदार तेजस्वी सुर्याही तिला ट्विटवर फॉलो करतात हे समोर ल्याने भाजप तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं.

 

एक फेब्रुवारी रोजी कपील गुज्जर याने शाहिन बाग येथे सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी हवेत गोळीबार केला होता. कपिलने गोळीबार केल्यानंतर लगेचच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. समोर आलेल्या माहितीनुसार कपिलच्या वडीलांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकीटावर दिल्ली महानगर पालिकेची निवडणूक लढली होती.

 

Web Title:  Right wing supporter Gunja Kapoor dons Burkha to enter Delhi Shaheen Bagh detained by Delhi Police.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x