24 November 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

संघ मोदी 'भक्तांवर' नाराज, संघातील नागपूर लॉबी 'दक्ष' झाली ?

नागपूर : नरेंद्र मोदी खूप झपाट्याने देशात मोठे होत आहेत त्यामुळेच कि काय नागपूर लॉबी जरा दक्ष झाल्याचे समजते. सध्या नागपुरातील लॉबी दक्ष झाल्यामुळे आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात द्वंद्व पेटल्याचे पाहावयाला मिळत आहे. मोदींचा देशभरात आवाका दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे शेवटी संघातील नागपूर लॉबी मोदी ‘भक्तांच्या’ बाबतीत जास्तच ‘दक्ष’ झाल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर लॉबीने त्याआधी २०१५ मध्ये आणि याच महिन्यात म्हणजे २०१८ मध्ये मोदींच्या प्रयत्नांना सुरुंग लावल्याची चर्चा आहे. लवकरच म्हणजे २०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी आणि अमित शहा यांना नियंत्रणात कसे ठेवायचे कसे हा प्रश्न पडला आहे. संघाच्या गोटात यावर खूप गंभीरपणे चर्चा सुरु असल्याचे समजते आणि चर्चेला कारण ठरले आहे, ईशान्येतील निवडणुका जिथे मेहेनत घेतली संघाने परंतु भाजपने सर्व श्रेय घेतल्याने संघातील वरिष्ठ खूप दुखावले गेल्याचे समजते.

परंतु २०१९ पूर्वीच मोदींना नियंत्रणात ठेवण्यासाठी संघ सज्ज झाला आहे त्यामुळेच मोदींनी खूप मोठे प्रयत्न करून सुद्धा संघातील महत्वाच्या पदावर म्हणजे सरकार्यवाह पदावर मोदींच्या दबावानंतर सुद्धा दत्तात्रय होसबळे यांना या पदापासून संघाने दूरच ठेवणे पसंत केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सरकार्यवाह या महत्वाच्या पदावर जे सरसंघचालक पदानंतरचे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकार असलेले पद म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी भैयाजी जोशी म्हणजे सुरेश जोशी यांची निवड करण्यात आली. नरेंद्र मोदी हे दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाहपदावर वर्णी लावण्यास खूप प्रयत्नशील होते, परंतु संघाच्या नागपूर लॉबीने मोदींचा पंतप्रधान झाल्यापासून दोन वेळा केलेला हा प्रयत्न अपयशी केला आहे.

दत्तात्रय होसबळे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मार्गे संघात दाखल झाले होते आणि मुख्य म्हणजे ते संघाच्या मुशीत मोठे झालेले नव्हते, त्यामुळे संघाने त्यांना त्या महत्वाच्या पदापासून दूरच ठेवणे पसंत केले आहे. काही लोक केवळ पदाच्या लालसेने इतर संघटनांमधून संघात प्रवेश करतात आणि मोठे पद मिळवतात आणि अशा व्यक्तींना संघातूनच खूप विरोध करण्यात येत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे गुजरातच्या प्रांत प्रचारक पदावरून हटवल गेलेल्या डॉ. मनमोहन वैद्य यांची सहसरकार्यवाहपदी निवड करून संघाने संघटनेतील स्वतःचे बहुमत सुद्धा कायम ठेवण्याची काळजी घेतली आहे. डॉ. मनमोहन वैद्य हे संघातील मोठे व्यक्ती म्हणून ओळख असलेले मा. गो. वैद्य यांचे सुपुत्र आहेत. दुसरं महत्वाच म्हणजे आणखी एक सहसरकार्यावह पदी विराजमान झालेले डॉ. कृष्णगोपाल हे केंद्र सरकार आणि संघातील अधिकृत दुवा म्हणून ओळखले जातात तसेच संघातील सत्ता केंद्र अशी त्यांची ओळख आहे ते सुद्धा नागपूर ‘लॉबीचे’ समर्थक आहेत. भाजपातील मंत्रिमंडळात त्यांच्या शिफारशींवरूनच बरेचजण आज मंत्रिमंडळात आहेत. त्याहूनही महत्वाचं म्हणजे तेच नरेंद्र मोंदीच्या बदलत्या कार्यशैलीच्या तक्रारी राष्ट्रीय स्वयंसंघाकडे पोहोचवत आहेत हे महत्वाचे आहे.

मोदींपासून दूर असलेले आणि राजनाथ सिंग यांच्या जवळचे मानले जाणारे मध्य प्रदेशचे सुरेश सोनी, वी. भागय्या आणि मुकुंद सी. आर हे सर्व संघाच्या शाखेत आणि तालमीतले म्हणून ओळखले जातात ते सर्व ‘नागपूर लॉबीचे’ समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच २०१९ च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संघातील वरिष्ठांनीच कंबर कसल्याचे समजते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x