रशियाकडून कोरोनावर वापरण्यात आलेल्या औषधाची भारतातही चाचणी होणार
नवी दिल्ली, १३ जून: कोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर अॅझीथ्रोमायसीनच्या वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी करणार असल्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलशी संबंधित एका सूत्राने याबाबतची पुष्टी केली की, 10 जून रोजी जाहीर झालेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये अॅझिथ्रोमायसिनचे एचसीक्यूसोबत वापर करण्याचा उल्लेख केला नाही. यापूर्वी आयसीएमआरने अशी शिफारस केली होती की, कोरोनावरील उपचारांसाठी एचसीक्यूसह अॅझिथ्रोमायसिन देखील दिले जाऊ शकते.
दिल्लीतील एम्सनेही या नव्या नियमाचं पालन करण्यास सुरवात केली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालय कोरोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जाणार आहेत. कोरोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरं औषध दिलं जाऊ शकतं.
दुसरीकडे फेविपिराविर या घटकापासून बनविलेल्या एव्हिफेविर या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापर करण्यास रशियानेही दिलेली संमती आहे. इन्फ्लुएंझा तापावर देण्यात येणारे फेविपिराविर कोरोनावर प्रतिबंधक औषध म्हणूनही उपयोगी ठरेल का हे तपासण्याकरिता भारतातही माणसांवर चाचण्या सुरू आहेत. एव्हिफेविर हे कोरोना आजारावर अत्यंत परिणामकारक औषध ठरू शकेल असा विश्वास या औषधाच्या रशियातील उत्पादकांनी व्यक्त केला आहे.
फेविपिराविरचे भारतातील उत्पादन मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीतर्फे केले जाते. रशियामध्ये एव्हिफेविर हे औषध कोरोना रुग्णांना दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेन्ट फंड (आरडीआयएफ) या संस्थेने सांगितले की, रशियातील रुग्णालयांमध्ये जून महिन्यात एव्हिफेविर औषध अनेक रुग्णांना देण्यात येईल. या औषधाचे त्यांच्यावरील परिणामही अभ्यासण्यात येतील. एव्हिफेविर व फेविपिराविर यांच्यात साम्य असल्याने रशियात माणसांवर सुरू असलेल्या प्रयोगांतील निष्कर्षांचा भारतालाही खूप फायदा होणार आहे.
News English Summary: Russia has also agreed to use Avifavir, a drug made from the ingredient Favipiravir, in the treatment of corona patients. Tests are also being conducted on humans in India to see if fevipiravir, which is given for influenza fever, can be used as a preventative drug against corona.
News English Title: Russia has also agreed to use Avifavir drug made from the ingredient Favipiravir in the treatment of corona patients News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News