20 April 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

फेक न्युज पसरविणाऱ्यांविरुद्ध मोदी सरकार कारवाईला करणार | मग BJP IT Cell? - प्रशांत भूषण

Senior advocate, Prashant Bhushan, BJP IT Cell, fake news

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी: सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारच्या निर्देशाला उत्तर दिले आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘कंपनीने ५०० पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट्स कायमस्वरूपी बंद निलंबित केले आहेत, ते स्पॅमच्या श्रेणीत येत होते आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत होते. त्याशिवाय वादग्रस्त हॅशटॅग्जही हटवण्यात आले आहेत.

ट्विटरने म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तीन वेगवेगळ्या आदेशांत शेतकरी आंदोेलनाशी संबंधित एकूण १४३५ अकाउंट्स बंद करण्यास सांगितले होते. त्यापैकी काही अकाउंट्स फक्त भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. कंपनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे आणि अलीकडेच केंद्र सरकारने ज्याआधारे ट्विटर अकाउंट्स बंद करण्यास सांगितले होते ते भारतीय कायद्यांस अनुरूप आहे असे आम्हाला वाटत नाही. भारत सरकारने शेतकरी आंदोलनासंदर्भात चिथावणीखोर मजकूर पसरवणारे अनेक अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश दिले होते. सरकारने म्हटले होते की, हे हँडल्स पाक समर्थित, खलिस्तान समर्थकांचे असून विदेशातून ऑपरेट होत आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने ट्विटरवरील प्रक्षोभक माहिती प्रसारित करणारी अकाउंट्स सेंसर करण्याची मागणी केली होती. परंतु ट्विटरकडून त्याकडे काणाडोळा करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यावरून सरकारने आपली भूमिका कठोर केली असून, ट्विटरने आदेशांचे पालन न केल्यास ट्विटरच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली जाईल, तसेच कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच फेक न्युज पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याच विषयाला नुसरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मोजक्या शब्दात ट्विट करून भाजपाला टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे की, “भाजप IT Cell?”

 

News English Summary: Social media company Twitter has responded to the central government’s directive. Twitter wrote in its blog, ‘The company has permanently suspended more than 500 Twitter accounts, falling into the category of spam and abusing our platform. Controversial hashtags have also been removed.

News English Title: Senior advocate Prashant Bhushan question Modi govt over BJP IT Cell fake news spread news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या