23 February 2025 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सुप्रीम कोर्टाने ही तत्परता इतर कैद्यांच्या बाबतीत का दाखवली नाही - प्रशांत भुषण

Senior Advocate Prashant Bhushan, Arnab Goswami bail, Supreme Court

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे अर्णबसह इतर दोघांची सुटका झाली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. परंतु, त्याच्या सुटकेवर मोठा राजकीय गदारोळ माजला होता. असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या तत्परतेवरून अनेकांनी न्यायपालिकेवर टीका केली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या तातडीच्या सुनावणीबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गोस्वामी यांची याचिका ऐकत सुप्रीम कोर्टाने त्यांची सुटका लगेच केली. एकीकडे अनेक वर्षे कोठडीत न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल प्रशांत भूषण यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कॅव्हेट दाखल केले होते. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी तातडीच्या सुनावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु, सुट्टीतील न्यायालयासमोर सुनावणी झाली. चौकशीसाठी पोलिसांना योग्य ते सहकार्य करा, या अटीवर अर्णबसह अन्य दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

News English Summary: After hearing Goswami’s plea, the Supreme Court released him immediately. On the one hand, Prashant Bhushan has asked why such readiness is not shown in the case of prisoners who have been waiting for justice for many years. He tweeted about it.

News English Title: Senior Advocate Prashant Bhushan question over Supreme court decision of bail to Arnab Goswami news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x