22 November 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

अण्णांची वास्तवात उपोषणं कमी | परंतु उपोषण मागे घेण्याचा इतिहास कायम

Senior social activist Anna Hazare, Mediation Cancel

राळेगणसिद्धी, ३० जानेवारी: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल  (२९ जानेवारी) उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होत नसल्याने अण्णा हजारे हे ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, काल अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चाैधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले आहे.

अण्णा हजारे केंद्राचे ३ कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिध्दीत भेट घेतली.

भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, कोरोनामुळे अण्णांनी सुचिवलेल्या प्रश्नांना उशीर झाला. आता अण्णांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रात उच्चस्तरीय कमिटी स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक आयोिजत करणार असून यावेळी अण्णा हजारे हेही उपस्थित राहतील. समितीतील सदस्यही अण्णाच सुचवतील.

कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल माध्यमांमध्ये शंका उपस्थित केल्या जात असून, शिवसेनेनंही अण्णा हजारे यांना काही सवाल केले आहेत. मोदींनी धोका दिला असं सांगणाऱ्या अण्णांनी पुन्हा मोदी सरकारवर विश्वास दाखवल्याने अण्णांची विश्वासहर्ता संपुष्टात आल्याचं म्हटलं जातंय.

 

News English Summary: Senior social activist Anna Hazare today (January 29) called off his fast with the mediation of Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Assembly. As the demands of the farmers are not being met, Anna Hazare was going on a hunger strike in Ralegan Siddhi from January 30. Meanwhile, BJP leaders, including Union Minister of State for Agriculture Kailash Chaidhary, met Anna in Ralegan Siddhi yesterday. Anna has called off the fast after the Center promised to set up a high-level committee on his demands immediately.

News English Title: Senior social activist Anna Hazare yesterday called off his fast with the mediation news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x