25 December 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण

Sexual harassment, BJP woman office bearer, Uttar Pradesh, Marathi News ABP Maza

लखनौ, २४ सप्टेंबर: उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात यापुढे कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्यानंतर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांचे फोटो लावण्याच्या पोलिसांच्या या मोहिमेला ‘मिशन दुराचारी’ असं नाव देण्यात आलं आहे. या सर्व मोहिमेची जबाबदारी पोलीस खात्याकडे देण्यात आली आहे.

दुसरीकडे भाजपच्या महिला पदाधिकारी असलेल्या महिलेने पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. अलीगढ ठाणे क्षेत्रातील देहली गेट परिसरातील उस्मानपाडाच्या रहिवाशी असलेल्या महिला अध्यक्षा फरहीन मोहसीन यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर हे आरोप लावले आहेत.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर अध्यक्ष इमरान अलीम सैफी यांनी खराब नियत ठेऊन आपले शोषण केल्याचे फरहान यांनी म्हटले आहे. फरहीन यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या घरी काही गुंडांना पाठवून मारहाण करण्यात आली, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

फरहीन मोहसीन यांनी सांगितले की, मी 2013 पासून भाजपाची सक्रीय सदस्य असून अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष इमरान अलीम सैफी यांच्यासमवेत महानगराची महिला अध्यक्ष आहे. मी भाजपासाठी काम करत असून काहींना ते पाहवत नाही. त्यामुळे, या लोकांकडून मला सातत्याने या ना त्या मार्गाने त्रास देण्यात येत आहे. माझ्या व्यवसायालाही पूर्णपणे बंद करण्याचं काम याच लोकांनी केलं. गेल्यावर्षी माझ्या पतीसोबत मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर, आता 21 सप्टेंबर रोजीही पुन्हा मला व माझ्या पतीला मारहाण करण्यात आली आहे. इमरान अली सैफीची वाईट नजर माझ्यावर होती. जर, तू माझं ऐकशील तर मी तुला मोठ्या पदापर्यंत पोहोचवले, असे ते म्हणत. मात्र, मी त्यांचं न ऐकल्यामुळे मला त्यांच्या टीममधून बाहेर काढण्यात आलं होतं, असा आरोपही फरहीन यांनी केला आहे.

 

News English Summary: A woman BJP office-bearer has accused senior party functionaries of sexual harassment. Farheen Mohsin, a resident of Usmanpada in Dehli Gate area of ​​Aligarh Thane area, has leveled these allegations against senior office bearers. Farhan has said that Imran Alim Saifi, the metropolitan president of the BJP Minority Front, exploited him with bad intentions.

News English Title: Serious allegations of sexual harassment by senior leader BJP woman office bearer in Uttar Pradesh crime Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x