22 November 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

सरकारने श्रीराम जन्मभूमी ट्रस्टवर भ्रष्टाचारी लोकं घेतले | कोण चंपत राय?, कधी नावही ऐकले नव्हते - शंकराचार्य

Ram Janmabhumi Land scam

मुंबई, १६ जून | श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्मिती ट्रस्टवर लागलेल्या आरोपांवरून आता शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय बेजबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत पदावरून दूर करावे असे शंकराचार्य म्हणाले आहेत. द्विपीठाधीश्वर जगदगुरूंनी नरसिंहपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.

भ्रष्ट माणसाला ट्रस्टवर बसवले, त्वरीत हटवा:
उल्लेखनीय बाब म्हणजे, आम आदमी पक्षाने राम जन्मभूमी मंदिर निर्मिती ट्रस्टवर गंभीर आरोप केले. शंकराचार्य पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने ट्रस्ट तर बनवला पण त्यामध्ये भ्रष्टाचारी लोकांना सामावून घेतले. चंपत राय आहेत तरी कोण? यापूर्वी त्याचे नाव कुणीही ऐकलेले नाही. तरीही त्यांना राम मंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा करण्यात आले.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी गोहत्या बंदी लागू केली नाही त्यावरून सुद्धा शंकराचार्य यांनी मोदी सरकारचे नाव न घेता निशाणा साधला. शंकराचार्य म्हणाले, गोहत्या बंदी लागू करण्यासाठी ज्यावेळी यांचे दोन खासदार होते तेव्हा हे लोक आग्रही होते. पण, जेव्हा खासदारांची संख्या 200 झाली तेव्हा गोहत्या बंदी विसरूनच गेले.

मंदिर निर्मितीसाठी जी रक्कम गोळा करण्यात आली त्यातून महागड्या किमतींवर जमीन खरेदी करण्यात येत आहे. अशात चंपत राय म्हणतात की आमच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचे आरोप सुद्धा झाले आम्ही कसलीच परवा करत नाही हे म्हणणे बेजबाबदारपणाचे आहे. इतके बेजबाबदार लोक ट्रस्टवर बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत तेथून हटवावे असेही शंकराचार्य म्हणाले आहेत.

शुभ मुहूर्तावर झाला नाही कोनशिला कार्यक्रम:
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी कोनशिला समारंभाच्या तिथीवर सुद्धा आक्षेप नोंदवला. मंदिराचे शिलान्यास अत्यंत अशुभ मुहूर्तावर करण्यात आले. आम्ही आधीच त्याचा विरोध केला होता, पण कुणी त्यावर लक्ष घातले नाही. त्यामुळेच आता बुद्धी भ्रष्ट होत आहे आणि त्याची उदाहरणे समोर येत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Shankaracharya said that corrupt chairman in the Ram Temple Trust is irresponsible news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x