28 December 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, पोस्टाची ही योजना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देईल, फायद्या घ्या SIP Mutual Fund | पैशाचा मॅजिक फॉर्म्युला, 21 व्या वर्षापर्यंत तुमचा मुलगा देखील होईल कोटींचा मालक; फक्त हा फॉर्म्युला फॉलो करा Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 30% परतावा दिला, खरेदीला तुफान गर्दी - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | बँक FD 10 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा दर वर्षी देणाऱ्या फंडाची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा Penny Stocks | 48 पैशाच्या पेनी शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले, दणादण परतावा मिळतोय - Penny Stocks 2024
x

शरद पवार सुधारणांच्या बाजूने | राजकारणासाठी काहींचा यूटर्न - पंतप्रधान

Sharad Pawar, Agricultural reforms, PM Narendra Modi, RajyaSabha

नवी दिल्ली, ०८ फेब्रुवारी: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या योजना आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी संसदेत अधोरेखित करतानाच विरोधकांवरही टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेकांनी कृषी सुधारणांची वकिलीही केली. पण काहींनी राजकारणासाठी या कायद्यावरून यूटर्न घेतला, अशी अप्रत्यक्ष टीका नरेंद्र मोदी यांनी पवारांवर केली.

नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत कृषी कायद्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आमचे आदरणीय शरद पवारजी यांनी कृषी सुधारणांची वकिली केली. शरद पवारांनी आताच सांगितलं मी कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेक नेत्यांनीही कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचं सांगितलं. आता अचानक काही लोकांनी राजकारणासाठी यूटर्न घेतला. त्यासाठीच त्यांनी त्यांचे विचार मांडले, अशी अप्रत्यक्ष टीका मोदींनी पवारांवर केली. कृषी कायद्याबाबत माझं म्हणणं ऐकू नका, पण किमान मनमोहन सिंग यांचं तरी म्हणणं ऐका. मनमोहन सिंग यांनी जे सांगितलं. तेच मोदी करत आहे, याचा अभिमान तर बाळगा, असं टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही. एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं.

तसेच एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवं, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया.. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत MSP आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचं आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

 

News English Summary: Narendra Modi today castigated the opposition over the Agriculture Act in the Rajya Sabha. Our esteemed Sharad Pawarji advocated for agricultural reforms. Sharad Pawar has just said that I am in favor of agricultural reforms. Many leaders, including the Congress, also said they were in favor of agrarian reforms. Now all of a sudden some people took uterine for politics. That is why he presented his views, Modi indirectly criticized Pawar. Don’t listen to me on agricultural law, but at least listen to Manmohan Singh. What Manmohan Singh said. That is what Modi is doing, be proud of it, he added.

News English Title: Sharad Pawar has just said that I am in favor of agricultural reforms said PM Narendra Modi in RajyaSabha news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x