27 January 2025 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

शरद पवार यांचा विरोध पंतप्रधान मोदींना नव्हे तर थेट प्रभू रामचंद्रांना - उमा भारती

Sharad Pawar, Lord Ram Mandir, PM Narendra Modi, Uma Bharti

नवी दिल्ली, २० जुलै : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.

पवार म्हणाले होते, “कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”

दरम्यान, यावरून भाजपच्या नेत्या उमा भरती यांनी अत्यंत कडवट प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी केलेलं राम मंदिराबाबत केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातलं नाही तर प्रभू रामचंद्रांविरोधातलं आहे अशी घणाघाती टीका उमा भारती यांनी केली आहे. त्यामुळे आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या फायर ब्रांड नेत्या उमा भारती या कडाडल्या आहेत. शरद पवार यांनी केलेली टीका ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातली नसून थेत प्रभू रामचंद्रांच्या विरोधातली आहे असं आता त्यांनी केली आहे.

 

News English Summary: Uma Bharti has slammed Sharad Pawar’s statement on Ram Mandir, saying it was not against Prime Minister Narendra Modi but against Lord Ramchandra. Therefore, there is a possibility of a dispute between the BJP and the NCP.

News English Title: Sharad Pawar Statement Is Against Lord Ram Not Against PM Narendra Modi Says Uma Bharti News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x