NDA फक्त नावाला | मोदींच्या मनात काय आहे याची कोणाशीही चर्चा होतं नाही
चंदीगड, २८ सप्टेंबर : कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने शनिवारी रात्री उशिरा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा एकप्रकारचा झटका आहे. कारण मागच्या २२ वर्षांपासून हा पक्ष भक्कमपणे भाजपासोबत होता.
“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. एनडीए फक्त नावाला आहे” अशा शब्दात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी रविवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “मागच्या सात, आठ, दहा वर्षापासून एनडीए फक्त नावाला आहे. एनडीएमध्ये काही नाही. एनडीएमध्ये कुठली चर्चा होत नाही, काही प्लानिंग नाही किंवा कुठली बैठक होत नाही. मागच्या दहा वर्षात पंतप्रधानांनी त्यांच्या मनात काय आहे? यावर चर्चा करण्यासाठी लंचला एनडीएची बैठक बोलावल्याचे मला आठवत नाही” अशी खंत सुखबीर सिंग बादल यांनी बोलून दाखवली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
“आघाडी फक्त कागदावर असू नये. यापूर्वी वाजपेयी यांच्याकाळात एनडीएमध्ये योग्य पद्धतीने संबंध जपले जायचे. माझे वडिल एनडीएचे संस्थापक सदस्य आहेत. आम्ही एनडीए बनवली पण आज एनडीए नाहीय हे खूप दु:खद आहे” असे सुखबीर सिंग बादल म्हणाले.
दुसरीकडे मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावरुन शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे. हे सरकार पाच वर्ष धावत राहील अशी स्थिती आहे. भविष्यात देशाच्या राजकारणात उलथापालथ घडविणारी आघाडी निर्माण होईल काय? याची चाचपणी सुरुच असते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे. काँग्रेस आजही मोठा पक्ष आहे. पण राष्ट्रीय पातळीवर निवडणुका जिंकल्याशिवाय राजकीय मोठेपण सिद्ध होत नाही. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. नवा सूर्य उगवेल काय?” असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
News English Summary: There is a long history behind the decision by the Shiromani Akali Dal (SAD) to sever ties with the National Democratic Alliance (NDA). According to Hindustan Times’ sister publication Hindustan, SAD was upset over being ignored by the Bharatiya Janata Party-led government at the Centre. There are close to half a dozen instances where SAD didn’t get the expected sport from its long-time ally. The most recent one was the move by the Centre to make Kashmiri, Dogri and Hindi the official languages of Jammu and Kashmir. SAD wanted Punjabi to be included in the list, since there is a substantial chunk of Punjabi speaking people in the region.
News English Title: Shiromani Akali Dal Sukhbir Singh Badal criticized Prime Minister Narendra Modi over NDA issue Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO