15 November 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

देशातील 'ती' श्रीमंत शक्तिशाली आणि दिग्गज राजकीय हस्थी म्हणजे 'शिवसैनिक' | इंडिया टुडेच्या पत्रकाराचा हास्यास्पद दावा

Adar Poonawala

मुंबई ०३ एप्रिल | भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं ‘सीरम’ हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली होती. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. परंतु, ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी म्हटलं होतं की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती.

त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. ‘The Times’ ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं होतं की, हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’ पुढे पुनावाला यांनी म्हटलंय की, यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व होती.

दरम्यान, आता एक हास्यास्पद वृत्त समोर आलं आहे. शिवसेनेतील काही गुंडांनी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांना धमकावले. त्यामुळे अदर पुनावाला परदेशात निघून गेले, असे वक्तव्य ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात सुभाष देसाई यांनी नमूद केले आहे की, राहुल कनवाल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष देसाई यांनी पत्रात केली आहे.

याला हास्यास्पद यासाठी म्हणावं लागेल की पुनावाला यांनी संधीत व्यक्तिमत्व देशातील शक्तिशाली आणि धनाढ्य राजकीय व्यक्ती असल्याचं म्हटलेलं. आता संबंधित पत्रकाराने दावा केल्याप्रमाणे ‘ते’ काही शिवसैनिक हे देशातील शक्तिशाली आणि धनाढ्य राजकीय व्यक्ती आहेत यावर हसावं की रडावं ते देखील समजण्या पलीकडील आहे. विशेष म्हणजे शिवसैनिक धमक्या देतात आणि देशातील तसेच जगातील अति श्रीमंतांच्या यादीत मोडणारे पूनावाला थेट देश सोडून परदेशात जातात हे त्यापेक्षाही हास्यास्पद म्हणावं लागेल. त्यामुळे केवळ राजकीय कलह निर्माण करण्यासाठी तर हा खोडसाळपणा केला नाही ना याबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे.

 

News English Summary: Today in the India Today election coverage, their anchor, Rahul Kanwal cooked up a lie to accuse the ShivSena of threatening Adar Poonawala. This baseless piece of journalism is nothing but an attempt to malign the party Our letter to India Today Group said Shivsena.

News English Title: Shisvena allegation on India Today anchor Rahul Kunwal over treat call to Adar Poonawala news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x