17 April 2025 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

अवजड अपमानानंतर उद्धव ठाकरे संतापले; बेरोजगारीवरून मोदी सरकारला सुनावले

Narendra Modi, BJP, Udhav Thackeray, Shivsena

मुंबई : जुन्या वादाला विसरून भारतीय जनता पक्ष – शिवसनेने युती करत लोकसभा निवडणुकीत यश घवघवीत मिळवले. ४ दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराची आठवण करून देणाऱ्या शिवसनेने आज पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून महागाई आणि वाढत्या बेरोजगारी या मुद्यांवरुन मोदी सरकारचे कान टोचले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या ५ वर्षात दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते, परंतु तसे अजिबात झाले नाही. केवळ भाषणात शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. देशाची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या संकटात आहे. नवीन अर्थमंत्री यांनी मार्ग काढावे अशी मागणी शिवसेनचा मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

दिल्लीत नवे सरकार कामास लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या चित्रावर आव्हानांचे काळे ठिपके स्पष्ट दिसू लागले आहेत. देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के झाला. मागील ४५ वर्षांतला हा सर्वात मोठा आकडा आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय कामगार मंत्रालयानेदेखील त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. अर्थव्यवस्था संकटात आहे. नवनियुक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मार्ग काढावे अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षने सत्तेत येण्यापूर्वी, दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते व त्या हिशेबाने मागच्या पाच वर्षांत किमान दहा कोटी बेरोजगारांना आतापर्यंत रोजगार मिळायला हवे होते. परंतु, ते झालेले दिसत नाही व त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही, अशी भूमिका सामनामधून मांडण्यात आली आहे.

BSNLच्या हजारो कामगारांवर बेकारीची कुऱहाड कोसळली आहे. नागरी हवाई वाहतूक व्यवसायाचे कसे ‘बारा’ वाजले आहेत हे जेट कर्मचाऱयांच्या रोजच्या आंदोलनावरून स्पष्ट होते. चीनमध्ये काम करणाऱ्या तीनशेअमेरिकी कंपन्या म्हणे तेथील गाशा गुंडाळून भारतात येत आहेत, असे निवडणुकीपूर्वी चित्र उभे केले. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर व्यापारी निर्बंध लादले आहेत. हे चित्र संभ्रमात टाकणारे आहे. महागाई, बेरोजगारी, घटते उत्पादन व बंद पडत चालेले उद्योग या आव्हानांना तोंड द्यावे लागेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या