16 April 2025 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत

Shivsainks In Ayodhya, Balasaheb Thackeray Memorial, Ram Mandir Bhoomi Pujan

लखनऊ, ४ ऑगस्ट: अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने एक कोटी रुपयांची देणगी दिली की नाही, यावरुन सुरु असलेला वाद सध्या चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला होता. ते सोमवारी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. तेव्हा चंपतराय यांनी म्हटले की, राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून एक कोटी रुपयांची देणगी आली आहे. मात्र, हे पैसे कुणी पाठवले हे माहिती नाही. मात्र, जी पोहच आली आहे त्यावर शिवसेना असे लिहिले असल्याचे चंपतराय यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात शिवसेनेने RTGS च्या माध्यमातून एक कोटी रुपयांची रक्कम पाठवल्याचा खुलासा केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे योगदान असल्याची आठवण ट्रस्टला Ram Mandir Trust करुन दिली.

दरम्यान, अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन बुधवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. या भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.

बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरुन देशभरात वादळ उठलं होतं. मात्र या घटनेनंतर शिवसेना या पक्षाची हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. गर्वसे कहो हम हिंदू है हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला नारा याच काळातला होता. त्यामुळे अयोध्या प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक अनोखं नातं होतं. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केलं जातं आहे त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन उपस्थित झाले आहेत.

 

News English Summary: Bhumi Pujan will be held at the hands of Prime Minister Narendra Modi. Shiv Sainiks have arrived in Ayodhya carrying soil from the memorial of Shiv Sena chief Balasaheb Thackeray for this Bhumi Pujan.

News English Title: Shivsainks In Ayodhya With The Soil Of Balasaheb Thackeray Memorial News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या