8 January 2025 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

सरकारने संवादाने प्रश्न सोडवावा | पण तुम्ही रस्त्यावर बॅरिकेड्स-खिळे लावल्यावर जग बोलणारच

Shivsena, Urmila Matondkar, Modi government, farmers protest

मुंबई, ०४ फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना उपयोगी वस्तू आणि लहान मुलांना खाऊ वाटप केलं. विलेपार्ले इथे उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: उपस्थिती लावून, चिमुकल्यांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.

शेतकऱ्यांचं आंदोलन हा आपला अंतर्गत विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी सरकारची आहे असं उर्मिला म्हणाल्या.अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पायउतार होण्यास नकार दिला होता. त्यांच्या समर्थकांनी संसद परिसरात गोंधळ घातला. संसदेचं नुकसान केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. तोच धागा पकडत आपणही अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नावर बोललो होतो. आपण तिथल्या हिंसाचाराचा निषेध केला होती, याकडे मातोंडकर यांनी लक्ष वेधलं.

सरकारनं संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा. पण शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले जाणार असतील, रस्त्यावर खिळे ठोकले जाणार असतील, तर जग बोलणारच, असं मातोंडकर म्हणाल्या. आपणही तिथल्या घटनांवर, हिंसाचारावर बोललो होतोच, असं त्यांनी पुढे म्हटलं. देश सध्या नाजूक परिस्थितीतून चालला आहे. त्यामुळे शब्द जपून वापरायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं.

 

News English Summary: Bollywood actress and Shiv Sena leader Urmila Matondkar distributed useful items to needy women and food to children on the occasion of her birthday. Urmila Matondkar attended Vile Parle and celebrated her birthday with Chimukalya. During the interaction with the media, he commented on various issues.

News English Title: Shivsena leader Urmila Matondkar slams Modi government over famers protest news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x