29 April 2025 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER
x

गौप्यस्फोट​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ | सरकार पाडण्यासाठी दीड वर्षांपासून षडयंत्र चालू होतं, पैसे घेऊन सत्तांतर घडवलं, माझ्याकडे क्लिप आहेत - आ. देशमुख

Shivsena

MLA Nitin Deshmukh | एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन सूरतला गेले. त्यांच्यासोबत आमदार नितीन देशमुखही होते. सूरतला गेलेले नितीन देशमुख परत आले. त्यांच्या परतीचे किस्से बरेच चर्चिले गेले. त्याच आमदार नितीन देशमुखांनी आता सत्तांतराबद्दल महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय. पैशांच्या बळावर सत्तांतर झालं असून, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या करेन, असा इशाराच देशमुखांनी शिंदेंना दिलाय.

अकोल्यात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार नितीन देशमुखांनी त्यांच्याविरुद्ध सुरू झालेल्या लाच प्रकरणाचा उल्लेख करत सत्तांतराबद्दल आपल्याकडे व्हिडीओ असल्याचा इशारा दिला आहे.

‘ईडी आणि एसीबीची धमकी देता, आम्हीच येतो आम्हाला खुशाल जेलमध्ये टाका, या पक्षासाठी आम्ही जेलमध्येही जाण्यास तयार आहोत. जे कारवाई करण्याची धमकी देत आहे ना, त्या बंडखोरीचा मी साक्षीदार आहे. पैसे घेऊन सत्तांतर घडवलं आहे. बंडखोरी न केल्याने मला एसीबीकडून चौकशीची धमकी देण्यात आली होती. असा आरोपच नितीन देशमुखांनी शिंदे गटावर केला.

‘हे जे बोलतात ना 50 खोके एकदम ओके.. हे गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी षडयंत्र चालू होतं. यांनी माझ्यावर पुन्हा चुकीच्या कारवाया केल्या तर, माझ्याकडे सुद्धा काही क्लिप आहेत. ज्यांनी या महाराष्ट्रात सत्तांतर घडवलं, ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे, असा इशाराच देशमुख यांनी शिंदे गटाला दिला.

बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे होते, म्हणून आम्ही उठाव केला, असं जे महाराष्ट्रातले नेते सांगतात ना त्यांच्या आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढून दाखवली, तर त्यांना बोलायला जागा राहणार नाही. महाराष्ट्रात पैशाने सत्तांतर झालं हे जर मी सिद्ध करून दाखवलं नाही तर या महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असंही देशमुख म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena MLA Nitin Deshmukh made serious allegations on Eknath Shinde check details 19 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony