26 December 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत

India corona pandemic

मुंबई, १४ मे | कोरोना आपत्तीत भारत देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करताना देशात सर्वाधिक चांगलं काम महाराष्ट्राने केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. अहंकार आणि राजकारण बाजूला ठेवून जर चर्चा केली तर देशातील परिस्थिती सुधारु शकते असा सल्लाही संजय राऊतांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

युपी बिहारमधील गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाही. या पूर्वी या देशात असं कधीच झालं नव्हतं. देशात नुसता हाहाकार माजला आहे. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. अहंकार आणि राजकारण विसरून जर बोलणी केली तर देश पुढे जाईल, असं ते म्हणाले.

राज्यात नेहमीच उत्तम काम झालं आहे. त्यांना बदनाम करण्याचं कामही नेहमीच झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशात महाराष्ट्राने उत्तम काम केलं आहे. केंद्र सरकार, पंतप्रधान आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल देशात लागू करायला हवं होतं, असं राऊत म्हणाले. कोरोनाचा संसर्ग वरखाली होत आहे. पण कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे काम महाराष्ट्राने उत्तम प्रकारे केलं आहे. त्याचं कौतुक देशात नव्हे तर जगभरात सुरू आहे, असंही ते म्हणाले.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी या संदर्भात पत्रं लिहिलं आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा कोरोनासाठी वापरण्यात यावा. दिल्लीचा नक्शा बदलून काय करणार? लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. गुरुवारी देशभरात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमित आढळले, तर 3 लाख 44 हजार 570 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. 4 दिवसापूर्वी, 10 मे रोजी 3.29 लाख नवीन रुग्ण आढळले होते, तर 3.55 लाख संक्रमित ठीक झाले होते.

 

News English Summary: Shivsena MP Sanjay Raut has criticized India for being reckless in the Corona disaster. He also accused the opposition of trying to discredit Maharashtra and said that Maharashtra had done the best job in the country. Sanjay Raut has also suggested that the situation in the country could improve if ego and politics are put aside.
News English Title:

News English Title: Shivsena MP Sanjay Raut has criticized Modi govt for being reckless in the Corona disaster news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x