23 January 2025 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा SBI Mutual Fund | कमालच करतेय 'ही' SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 4 पटीने परतावा, सेव्ह करून ठेवा ही योजना Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, 100 रुपयांच्या बचतीवर मिळेल 2,14,097 रुपये परतावा, डिटेल्स जाणून घ्या New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या
x

पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना आम्ही घाबरत नाही: संजय राऊत

मुंबई : ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूर येथे दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात शाब्दिक हमरीतुमरीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना उत्तर देताना असल्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे असे म्हटले आहे.

काल लातूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप सेनेतील युतीवरून शिवसेनेला थेट इशारा दिला होता. अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर येणार हे गृहीत होते. त्याप्रमाणे शिवसेनेने सुद्धा भाजपावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे आणि चोख प्रतिउत्तर दिले आहे.

संजय राऊत ट्विट करून म्हणाले की, ‘शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावटयांच्या इशारयाना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच “पटकवले” आहे. इतक्या लवकर विसरलात?

लातूर येथे बोलताना शाह यांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले. ‘युती होगी तो साथी को जितायेंगे नहीं हुई तो पटक देंगे’. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना त्यांनी दिली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता विद्यमान मंत्री, खासदार आणि आमदार मोठ्या राजकीय पेचात सापडले आहेत. लोकसभेत युती न झाल्यास सर्वात मोठा फटका हा शिवसेनेला बसण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x