शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत
मुंबई, १० फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१० फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांना निरोप देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले. त्याचसोबत गुलाम नबी आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावर, नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
मोदी आतापर्यंत 5 ते 7 वेळा ते भावनिक झाले आहेत. दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत, अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांचे अश्रू बाहेर पडले नाहीत, असं राऊत यांनी म्हटलंय. पुढे राऊत म्हणाले की, पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्यानंतर यापूर्वी अनेकदा भाजपच्या नेत्यांनी आंदोलनं केली. आता आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला आंदोलनजिवी म्हटलं जातं. आमच्यावर टीका केली जाते. भाजप दिल्लीत पोहोचला तो आंदोलनाच्या माध्यमातूनच. आज विरोधी पक्ष आंदोलन करत असताना टीका करतात, असं ते म्हणाले.
भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट्स हे लोकांना जनतेविरोधी वाटत असतील आणि राज्य सरकार त्यांची चौकशी करणार असेल तरी यामध्ये चूक काय आहे ? यावर आता भाजपच्या लोकांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले. आंदोलन करणे इतकं मोठी चूक काय झाली. भाजपच्या या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागणार आहे. कारण एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात आंदोलन करू नका आणि महाराष्ट्रातील भाजपचे लोक आंदोलन करण्याची भाषा करतात. त्यामुळे भाजपच्या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
News English Summary: Prime Minister Narendra Modi addressed the Rajya Sabha yesterday (February 10). While bidding farewell to Congress MP Ghulam Nabi Azad and 4 other MPs, Narendra Modi lauded senior Congress leader Ghulam Nabi Azad. At the same time, an incident with Ghulam Nabi Azad showed that Narendra Modi was emotional in the House. This is not the first time Narendra Modi has become emotional over this, it has happened many times before, said Shiv Sena leader Sanjay Raut.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut target PM Narendra Modi over Delhi Farmers protest news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो