22 January 2025 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

TRP'ची व्यवस्था ब्रॉडकास्टर मंडळींनी तयार केली | यात सरकारचा हस्तक्षेप नसतो

Showing provocative news, TRP, Union Minister Prakash Javadekar, Arnab Goswami

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर : टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स घोटाळा प्रकरणी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला Exclusive मुलाखत दिली. टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर (पॉलिटिक्स) नाविका कुमार यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना जावडेकर यांनी सर्व माध्यमांना उद्देशून एक सल्ला दिला. मीडियाने टीआरपीच्या मागे धावू नये, असे जावडेकर म्हणाले.

टीआरपीची सध्याची व्यवस्था ब्रॉडकास्टर मंडळींनी तयार केलेली आहे. यात सरकारचा हस्तक्षेप नसतो. टीआरपीच्या सध्याच्या व्यवस्थेत काही दोष असतील तर ते ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउन्सिलने (Broadcast Audience Research Council – BARC) दूर करणे आवश्यक आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी सरकार तयार आहे. टीआरपी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत जर काही तांत्रिक गडबड झाली असेल तर ते प्रकरण न्यायालय हाताळेल, असेही जावडेकर म्हणाले.

बार्क हे प्रकरण हाताळेल – जावडेकर
टीआरपी घोटाळ्यात ३ चॅनलचे नाव आल्यानंतर जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. आधी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून टीआरपी निश्चित केला जात होता. आता ब्रॉडकास्टर एकत्र आले आणि त्यांनी बार्क या संस्थेची स्थापना केली. ही संस्था टीआरपी बघते. टीआरपी निश्चित करण्याच्या व्यवस्थेतील दोष दूर करण्याची जबाबदारी बार्कची आहे. याआधीही वेळोवेळी टीआरपीच्या मुद्यावर तक्रारी आल्यानंतर संबंधित व्यवस्थेने टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ते बदल केले. आता या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी बार्क ही संस्था आहे. त्यांनी टीआरपी निश्चित करण्याच्या व्यवस्थेतील दोष दूर करणे आवश्यक आहे. सरकार यात थेट हस्तक्षेप करणार नाही. जर काही घोटाळा असेल तर तो विषय न्यायालय हाताळेल.

माध्यमांना स्वातंत्र्य आहे:
भारतात माध्यमांना स्वातंत्र्य आहे. माध्यमांवर बंधनं लादू नये या मताचेच हे सरकार आहे. आम्ही आपातकाळ अनुभवला आहे. त्यावेळी माध्यमांवर लादलेली बंधनं बघितली आहेत. हे प्रकार आम्ही करणार नाही, असे जावडेकर म्हणाले.

 

News English Summary: The government believes in press freedom but showing “provocative news” for the sake of TRP is not journalism and it must stop, Union minister Prakash Javadekar said on Wednesday. Speaking at an event organised by RSS newsletter Panchajanya, he said after paid news and fake news, this is the era of “TRP journalism”. “There used to be paid news, fake news and now there is TRP journalism. The unnecessary burden of TRP must be stopped by the media. Someday they will have to improve themselves,” the minister said.

News English Title: Showing provocative news for TRP must stop says Union Minister Prakash Javadekar Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#PrakashJavadekar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x