22 November 2024 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Corona Virus | गेल्या २४ तासांत ६१,५६७ नवे कोरोनाबाधित, ९३३ रुग्णांचा मृत्यू

India, Covid 19, Corona Virus, Covid19 Vaccine

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.

भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे. तर ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १४ लाख २७ हजार ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात पाच लाख ९८ हजार ७७८ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सात ऑगस्टपर्यंत देशात दोन कोटी ३३ लाख ८७ हजार १७१ करोना चाचण्या झाल्या आहेत.ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली.

 

News English Summary: In the last two days, more than 60,000 coronary heart disease patients have been found in the country. According to the Ministry of Health, 61,537 crore infected patients have been found in the country in the last 24 hours. In the last 24 hours, 933 people have died.

News English Title: Single Day Spike Of 61537 Cases And 933 Deaths Reported In India In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x